KINWATTODAYSNEWS

‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत’ सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय,किनवट या शाळेने विविध उपक्रमांनी हा दिन साजरा

किनवट (३जानेवारी) राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान अंतर्गत’ सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालय,किनवट या शाळेने विविध उपक्रमांनी हा दिन साजरा केला.

सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीताताई राठोड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले जयंती निमित्त वेशभूषा (सावित्रीबाई)व चित्र रंगभरण स्पर्धा पार पडली.या विद्यालयामार्फत रतनीबाई राठोड़ प्रा.शाळा,कीनवट व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदा या शाळेत चित्र रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.चित्र रंगभरण स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दि.१२जानेवारी”राजमाता जिजाऊ “जयंतीचे औचित्य साधून बक्षीस वितरण विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ किनवट अध्यक्ष मा.ॲड श्री सचिनजी राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.चित्ररंगभरण स्पर्धेकरिता श्री निलेश भिलवडीकर यांनी परिश्रम घेतले.सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत असंख्य विद्यार्थिनींनी उस्फूर्त सहभाग घेतला होता.

कार्यक्रमाचे सुत्र संचलन श्री सुनील निकम यांनी केले व आभार श्री निलेश भिलवडिकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक श्री प्रकाश राठोड,श्री गोमाजी चव्हाण,श्री व्यंकटराव उप्पे ,श्री राठोड पी.एस., श्रीमती माया देवराव,श्रीमती माया देवतळे, श्रीमती सुनिता तोरनेकर, श्रीमती छाया रिठे, श्रीमती सुनीता माजळकर,श्रीमती किर्ती वाढवे, श्रीमती सपना मंडारे तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

671 Views
बातमी शेअर करा