किनवट, प्रतिनिधी
नुतन वर्षाच्या पार्श्वभुमिवर कामगारांना विविध योजनांचा लाभ घेणे सुकर व्हावे तसेच प्रधानमंत्री पेंशन योजनेचा प्राधान्याने लाभ मिळावा यासाठी आ. केराम यांच्या कार्यालयामार्फत १ ते ३ जानेवारी दरम्यान कामगारांची ई नोंदणी करून त्यांना जॉबकार्ड वाटपाचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून कामगार बांधवांनी मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
किनवट माहूर तालुक्याचे आमदार भिमरावजी केराम यांच्या लोकार्पण, जनसंपर्क कार्यालय किनवट तर्फे नववर्षाचे औचित्य साधून मोफत ई-श्रमकार्ड वाटप शिबीराचे आयोजन दि. १ ते ३ जानेवारी दरम्यान करण्यात आले असून सदरची ई नोंदणी कामगारांना विविध योजना तसेच प्रधानमंत्री पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळे कामगार बांधवांनी मोठ्या प्रमाणात या शिबीराचा लाभ घेवून ई श्रमकार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आ. भिमरावजी केराम यांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते यांच्याकडून करण्यात आले आहे….
‘कुशल-अकुशल’ कामगारांची ई नोंदणी करून जॉब कार्डचे वाटप… “विविध योजनांसह प्रधानमंत्री पेंशन योजनेच्या लाभासाठी ठरणार उपयुक्त..” “आ. भिमरावजी केराम यांच्या कार्यालयातून अभिनव उपक्रम”
724 Views