*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.1.ऍड. दिलीप ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त आज जिल्यातील अन्नदाते,माध्यम प्रतिनिधी,ब्लँकेट देणारे नागरिक,भाजपा पदाधिकारी तसेच लायन्स सदस्यांचा संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स प्रांतपाल दिलीप मोदी हे होते.भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.संतुकराव हंबर्डे,रयत रुग्णालयाचे उपाध्यक्ष सुधाकर टाक भाजपा संघटन सरचिटणीस विजय गंभीरे जिल्हा सरचिटणीस अशोक धनेगावकर व व्यंकट मोकले महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉक्टर शितल भालके अनुसूचित जाति मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य अभिषेक सौदे हे उपस्थित होते.
सुरुवातीला दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती देताना नूतन वर्षात दीडशे अन्नदात्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.लायन्स सचिव अरुणकुमार काबरा,कोषाध्यक्ष सुरेश निलावार ,प्रोजेक्ट चेअरमन संजय अग्रवाल,कामाजी सरोदे,सुरेश शर्मा यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण साले, दिलीप मोदी,डॉ हंबर्डे,सुधाकर टाक,व्यंकट मोकले यांनी आपल्या भाषणातून सातत्याने उपक्रम घेत असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे कौतुक केले सूत्रसंचलन धीरज स्वामी यांनी तर स्नेहलता जैस्वाल यांनी आभार मानले.प्रमुख अतिथींच्या हस्ते रुग्णांना डब्यांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला भाजपा उपाध्यक्ष शितल खांडील,चिटणीस केदार नांदेडकर,ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जिंदम, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत पळसकर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, रुपेश व्यास, मेरवान जाधव, संतोष कदम, अनिल लालवाणी, दिलीप कलवानी, बसप्पा जनकवाडे, सुरेश जगताप, सविता काबरा,सुरेखा लांबे, मनीषा कुनसावळीकर हे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेशसिंग ठाकूर,मन्मथ स्वामी रूपेश व्यास,संतोष कदम, संतोष भारती,नरेश आलमचंदानी, रामनरेश वर्मा,राजेश यादव यांनी परिश्रम घेतले.