KINWATTODAYSNEWS

चिंधी बाजार व्यवसाय करणाऱ्यांना कायम स्वरूपाची दुकाने देण्याचे ठोस आश्वासनाची अंमलबजावणी तात्काळ करा.

उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे यांना माजी सत्ता पक्ष नेते संदिप जाधव यांच्या नेतृत्वाखाली लहू सेनेचे शिष्ट मंडळ भेटले

नागपूर – “चिंधी बाजार ” व्यवसाय करणाऱ्यांना कायम स्वरूपाची दुकाने देण्याचे ठोस आश्वासन महापौर यांनी तिनदा दिले , परंतु आश्वासना अंमलबजावणी झाली नाही , तरी तात्काळ अंमलबजावणी करा. या करीता उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे यांना माजी सत्तापक्ष नेते संदिप जाधव आणि लहू सेने चे प्रमुख संजय कठाळे यांच्या नेतृत्वाखाली भेटून चर्चा करून निवेदन दिले .
तसेच म.न.पा.तर्फे मागील दि.०१ आॕगष्ट १९९३ मध्ये सिव्हिल लाईन जुना ACP कार्यालय ते रामगिरी या मार्गाचे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे नामकरन कण्यात आले , तसेच माता कचेरी ( दिक्षा भूमी चौक) चौकाचे सुध्दा अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरन झाले होते , परंतु फुटपात करण्याचा वेळी फलक काढून फेकले. किती तरी वर्षा पासून फलक लावण्यात आले,ते फलक तात्काळ लावण्यात यावे.
दिक्षा भुमी चौकात अण्णाभाऊ साठे यांचा उभा पुतळा लवकर लावण्यात यावा. अश्या मागण्या बाबत चर्चा करुन उपमहापौर श्रीमती मनिषा धावडे यांना निवेदन दिले .
शिष्ट मंडळात सर्व श्री…मुरलीधर रणखांम , अशोक खडसे , दिनेश वानखेडे, किरण सनेश्वर, राजेश अडागळे , रविंद्र खडसे , नितिन वाघमारे , सुरेश कावळे , संजय ठोसर , नानाजी जाधव , इंदिरा हिवराळे , पायल वानखेडे , मिरा वानखेडे , सुशिल बावने, प्रकाश वानखेडे , रोशन लांडगे , रंदिप बावने ,ईत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते .

112 Views
बातमी शेअर करा