लोहा/प्रतिनिधी शिवराज दाढेल लोहेकर.
सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा.चंद्रमुनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दि २५डिसेबर रोजी मनुस्मती दहन हा कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित स्वप्नील शेटे , सचिन दाढेल यांनी आपले विचार मांडले . स्वप्नील शेटे यांनी मनुस्मृती मुळे समाजाची विभागणी दुर्दशा होऊन सामाजिक एकोपा कायमस्वरूपी नष्ट झाला . चातुर्वर्ण्य व्यवस्था येऊन अतिशय जाचक अटी , स्त्रिया वरील अन्याय अत्याचार वाढले…तसेच सचिन दाढेल यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याधी मनुस्मृती जाळून मानवी मुक्तीचा , स्वातंत्र्याचा पुरस्कार प्रदान केला….त्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांचे जन्मोजन्मी आभार मानले पाहिजेत अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या . सदरील कार्यक्रमाला आनंदा खिरबा एडके , दिपक जळबा वाघमारे , , ईश्वर कोठेवाड , श्याम निदानकर , संतोष वाघमारे , सतीश आनेराव , सदानंद धुतमल , संतोष भावे , रोमन खिल्लारे , छगन हटकर ,भैय्यासाहेब हंकारे , गिरीष भालेराव , राहुल गोडबोले उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज दाढेल यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधीर महाबळे यांनी केले….याच कार्यक्रमाच्या निमित्ताने 1 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या नियोजनाची चर्चा करण्यात आली…. सामाजिक चळवळ पुनर्जीवीत करण्याचे सर्वांनी एकमत केले. सदरील कार्यक्रम शौर्य दिन संयोजन समितीच्या वतीने घेण्यात आला .1 जानेवारीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली..
लोहा विश्राम गृह येथे मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला..
469 Views