KINWATTODAYSNEWS

उन्हाची पर्वा न करता पायी चालत जाऊन सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार यांनी दिल्या अनेक गावांना भेटी.

किनवट : सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार, भाप्रसे यांनी भर दुपारचे ऊन… रस्ताअसेपर्यंत चारचाकी… नंतर पायी – पायी …चालत जाऊन तालुक्यातील 46 किलोमीटर अंतरावरील अतिदूर्गम कुपटी (बुद्रूक )आदिवासी शिवारातील सिंचन विहीरी, सौरपंप, आश्रम शाळा, आरोग्य उपकेंदास भेटी देऊन दिवंगत कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन सांत्वन केले.


मागील मंगळवार प्रमाणे आज मंगळवार (दि.11) रोजी भर दुपारीच सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच.पुजार, भाप्रसे किनवटवरून उत्तरेला निघाले. कुठं जायचं चालकालाही माहित नव्हतं. 31 किलोमीटर अंतरावरील आदिवासी ग्राम बेल्लोरी (धानोरा) व नंदगाव येथील शेत शिवारात पायी चालत जाऊन बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहीरीच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर तालुक्यातील 46 किलोमीटर अंतरावरील अतिदूर्गम कुपटी (बुद्रूक ) गावात ते दाखल झाले. येथील शासकीय आश्रम शाळेस भेट देऊन पाहणी केली. तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या आपल्या कार्यालयातील काही दिवसांपूर्वी निधन झालेले लिपीक ढाकरे यांच्या घरी जावुन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. प्रथमच आयएएस अधिकारी गावात घरी येऊन दुःखात सहभागी होताहेत हे पाहूण कुटूंबिय व गावकरी अचंबित झाले. तसेच येथील आरोग्य उपकेंद्रास भेट देवुन कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेतली व योग्य ती घबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर झळकवाडी शिवार गाठले. तेथे सौरऊर्जेवर चालणाऱ्या हातपंपाची पाहणी केली. यावेळी त्यांचे समवेत नियोजन अधिकारी शंकर सांबरे प्रकल्प कार्यालयाचे लेखाधिकारी बुरकुले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) संजय घुमटकर व सहाय्यक लक्ष्मीकांत ओबरे होते. त्यानंतर घनदाट जंगलातून जलधारा मार्गे किनवट गाठले. कोरोनाच्या व्यस्त व्यवस्थापनातूनही वेळ काढून विविध योजनांची विकास कामे पाहण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी श्री पुजार उन्हातान्हाची पर्वा न करता अतिदूर्गम भागात भेटी देत असल्याने उपविभागातील अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले आहेत.

232 Views
बातमी शेअर करा