किनवट/प्रतिनिधी:
दिनांक २६ मे २०१९ रोजी किनवट येथिल साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने सामुहिक विवाह सोहळा संपन्न झालेल्या नवदापत्यांचे महाराष्ट्र शासन कन्यादान योजना यवतमाळ जिल्हातील असल्यामुळे गेले दोन वर्षा पासून सतत पाठपूरावा करुन २६ डिसेंबर २०२१ रोजी लाभार्थी गयाबाई जर्नादन सोंळके यांना प्रति २०,०००/ रु विस हजार रुपये धनादेश पत्रकार अनिल भंडारे सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे अल्पसंख्याक शहरध्यक्ष स.अनवर स.फखरोधीन,हरीभाऊ दर्शनवाड,जर्नादन सोंळके व यावेळी आयोजक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार उपस्थिती होते.
464 Views