धर्माबाद प्रतिनिधी (अब्दुल खादिर)
तालुक्यातील मौजे कारेगाव फाटा येथे राष्ट्रीकृत असलेली महाराष्ट्र बकेची शाखा स्थापन करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील मौजे कारेगाव फाटा हे धर्माबाद,उमरी,भोकर व नायगाव तालुक्याला जोडणाऱ्या रस्ता असून कारेगाव फाटाच्या परीसरात जवळपास ४० गावांचा संपर्क येतो.त्यामुळे परीसरातील शेतकरी बांधव आपले शेतमालाची विक्री येथील व्यापाऱ्यांकडे करीत असतात,तसेच कारेगाव फाटा येथे अनेक लहान मोठे दुकाने मोठया प्रमाणावर असून दररोज मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते.त्यामुळे व्यापारी व शेतकरी बांधवांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी धर्माबाद किंवा उमरी येथील राष्ट्रीयकृत बँकेत यावे लागत असल्यामुळे त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला साथ देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा उघडणे तेव्हढ्याच महत्वाचे आहेत.परीसरातील शेतकरी व व्यापारी दररोजच्या आर्थिक उलाढाल करण्यासाठी व बकेत शेतमालातून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी जवळपास ४० किलोमीटर अंतर वाहनावर ये-जा करावा लागत असल्यामुळे परीसरातील शेतकरी,व्यापारी व लहान मोठे दुकानदार वैतागले असून सदरील प्रकरणाची दखल भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी घेतली.व लगेच परीसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांची नेहमीची अडचण कायमस्वरूपी दूर व्हावे, यासाठी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट परीसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांची घालून दिली.व कारेगाव फाटा येथे राष्ट्रीकृत असलेली महाराष्ट्र बकेची शाखा स्थापन करण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे.यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कारेगाव फाटा येथे राष्ट्रीकृत असलेली महाराष्ट्र बकेची शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले असल्याचे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार यांनी सांगितले आहे.यावेळी सुभाष पाटील शिंदे,बाबुदादा जामोदेकर, दिंगबर जंगदबे, गणेश जंगदबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.