. हदगांव प्रतिनिधी :- महाराष्ट्र भर नवे तर इतर राज्यात अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधात व पत्रकार बांधवावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढा देणारी संघटना म्हणजे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नव्याने हदगांव तालुका कार्यकरणी निवड झाली असून मा. डी. टी. आंबेगावे सर संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मा. अनिल राठोड यवतमाळ जिल्हा अध्यक्ष व मा. राजेश मामीडवार नांदेड जिल्हा उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 24 /12/ 2021 रोजी शुक्रवारी हदगांव शासकीय विश्राम गृह येथे कार्यकरणी जाहीर करण्यात आली
यावेळी संदीप तुपकरी यांची नांदेड जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली हदगांव तालुका अध्यक्ष पदी कैलास तलवारे, तर उपाध्यक्ष म्हणून संतोष डवरे,यांची निवड करण्यात आली तर सचिव सिद्धार्थ वाठोरे,सह सचिव भगवान शेळके,कार्याध्यक्ष चंद्रकांत भोरे, कोषा अध्यक्ष संजय तोषणीवाल, संघटक गोवर्धन दायमां, व यावेळी सदस्य पंकज चव्हाण, तुषार कांबळे, आदित्य कदम, राजीव हापसे, रुपदेवी पाटील दादाराव खंदारे आदी पत्रकार बांधव निवडीस उपस्थित होते नवीन सर्व कार्यकरणी यांना वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डवरे सर यांनी केले तर आभार नवनिचित तालुका अध्यक्ष कैलास तलवारे यांनी केले
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघच्या हदगांव तालुका अध्यक्ष पदी कैलास तलवारे तर उपाध्यक्ष पदी संतोष डवरे यांची निवड
78 Views