KINWATTODAYSNEWS

उमेद MSRLM व आरसेटी नांदेड द्वारा मौजे बेटक बिलोली येथिल महिलांनी घेतले उद्योजकता विकास प्रशिक्षण

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.नांदेड येथे कार्यरत असलेल्या भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान (उमेद) द्वारा ग्राम बेटक बिलोली, ता. नायगाव, जिल्हा नांदेड येथे दिनांक १३.१२.२०२१ पासून १८.१२.२०२१ या कालावधीत सहा दिवसीय ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाचा ग्राम बेटक बिलोली मधील उमेद अंतर्गत महिला बचत गटातील १८ ते ४५ वयोगटातील ३५ महिलांनी लाभ घेतला. सदर प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास अंतर्गत उद्योजकीय सक्षमता, कार्य प्रेरणा,आत्मविश्वास बांधणी,स्वयं रोजगाराचे फायदे, व्यावसायिक संधी, ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक गुण, सकारात्मक दृष्टीकोन,संभाषण कौशल्य,धोका पत्करणे, गुणात्मक उत्पादन,मार्केटिंग व्यवस्थापन,मार्केट सर्व्हे, बँकिंग, प्रकल्प अहवाल,आर्थिक साक्षरता, सरल इंग्रजी तसेच बेसिक संगणक ज्ञान,शासकीय योजना,सामाजिक सुरक्षा योजना इत्यादी सविस्तर बाबींबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.

विविध मान्यवरांचे प्रोत्साहनात्मक मार्गदर्शन, ऍक्टिव्हिटी,पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन,खेळ आणि मार्केट सर्व्ह द्वारे प्रशिक्षाणार्थ्यांमध्ये प्रोत्साहन,स्वयं रोजगाराचे महत्व आणि त्याकडे वळण्याकरिता प्रेरणा निर्माण करण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आशिष राऊत,फॅकल्टी,आरसेटी नांदेड यांनी प्रशिक्षक,मार्गदर्शक, समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी द्वारा मोफत आयोजित करण्यात आला होता आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची व्यवस्था सुद्धा मोफत करण्यात आली.दिनांक १८.१२.२०२१ रोजी प्रशिक्षणाचा समारोपीय समारंभ आयोजित करण्यात आला.

यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाबाबत आनंद व्यक्त करून समाधानकारक मत व्यक्त केले. समारोपीय कार्यक्रमास अमोल जोंधळे,तालुका अभियान व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्नोती अभियान, नायगाव,राजू बोरगावकर, कौशल्य समन्वयक,महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवन्नोती अभियान,नायगाव.श्रीमती जनाबाई उत्तम रोडेवाड,सरपंच, ग्रा. प.,बेटक बिलोली,आशिष राऊत, प्रशिक्षक, भारतीय स्टेट बँक आरसेटी, नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थिती होते तसेच मान्यवरांचा हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्यामध्ये शिवणकाम,पापड मसाला बनविणे, कापडी आणि कागदी बॅग, लिफाफे, फाईल बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय व गांडूळखत निर्मिती, मोबाईल दुरुस्ती,दुचाकी वाहन दुरुस्ती,घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात.प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते.
यासर्व प्रशिक्षणाचा नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ संजय तुबाकले अति मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक MSRLM व प्रदीप पाटील,संचालक,भारतीय स्टेट बँक आरसेटी,नांदेड संचालक यांनी केले.

नांदेड जिल्ह्याला कर्तव्यदक्ष, प्रामाणिक,प्रेमळ,अभ्यासू, चिकित्सक व्यक्तिमत्व डॉ. संजय तुबाकले यांच्या रूपामध्ये जिल्हा परिषदेला लाभल्यामुळे जिल्ह्यात तसेच नायगाव तालुक्यात प्रभावी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद) ची कामे झपाट्याने व नाविन्यपूर्ण होत असल्याबाबत अमोल जोंधळे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वियेतेकरीता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे गजानन पातेवार जिल्हा अभियान व्यवस्थापक, द्वारकादास राठोड,धनंजय भिसे, गणेश कवडेवार, माधव भिसे, स्वप्नील कचवे, रमेश थोरात, कुलकर्णी(लेखाधिकारी),मयूर पवार,बाबू डोळे, हणमंत कंदुरके,समूह संसाधन व्यक्ती जयश्री पवार,बि.सी.सखी मनीषा पवार आणि माधव सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले

473 Views
बातमी शेअर करा