किनवट टुडे न्युज नेटवर्क : हिंगोली जिल्ह्याची रुग्णसेवेची गरज लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला अत्याधुनिक कार्डियाक रुग्णवाहिका लोकार्पित करून खऱ्या अर्थाने वाढदिवस साजरा करून सामाजिक भान जपले .
खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस हिंगोली लोकसभा मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केल्यानुसार अनाठायी खर्च टाळत सामाजिक उपक्रमांना शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते, असंख्य चाहत्यांनी प्रतिसाद दिला . त्यानुसार अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर ,रुग्णाना फळे वाटप,नेत्र तपासणी ,महाआरोग्य शिबीर , शालेय साहित्य वाटप, कीर्तन सोहळा ,ब्लँकेट वाटप , महिलांना साडीचे वाटप स्पर्धा परीक्षेचे आयोजन , महाभिषेक, अन्नदान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . खासदार हेमंत पाटील यांनी सुद्धा वाढदिवसावरील अनाठायी खर्च न करता स्वतःच्या खासदार निधीमधून हिंगोली जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेली रुग्णवाहिका हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयास लोकार्पित केली. यावेळी जि. प. अध्यक्ष गणाजी बेले , आ. संतोष बांगर ,सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे , उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे , संदेश देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम , माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धव गायकवाड , तालुका प्रमुख आनंद जगताप, भानुदास जाधव ,सखाराम उबाळे ,गटनेते श्रीराम बांगर , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. दिपक मोरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. करपे, नगर सेवक सुभाष बांगर , जि. प. सदस्य बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिल्लारे, डी. वाय . घुगे , शहरप्रमुख अशोक नाईक , किशोर मास्ट, माजी उपसभापती गोपू पाटील,पांडुरंग गुजर , लिंबाजी पठाडे, गंगाधर पोले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
अतिगंभीर असलेल्या रुग्णांना हिंगोली शहर आणि परिसरात अनेकदा उपचार मिळू शकत नाहीत तेव्हा त्यांना नांदेड, यवतमाळ, औरंगाबाद,मुंबई किंवा हैद्राबाद अश्या ठिकाणी न्यावे लागते त्याकरिता अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिकेची गरज भासते अश्यावेळी रुग्णाला मदतीसाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध त्याचा जीव वाचू शकतो त्यामुळेच खासदार हेमंत पाटील यांनी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे . रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनतेला आरोग्याबाबत येणाऱ्या अडीअडचणीसाठी सोडविण्यासाठी विशेष आरोग्यदूताची आणि जनसंपर्क कार्यकर्त्याची नेमणूक केली आहे आजवर हजारो रुग्णांना पंतप्रधान सहायता निधी , मुख्यमंत्री सहायता निधी , सिद्धिविनायक ट्रस्ट कडून दिला जाणारा मदत , धर्मादाय संस्थांकडून दिली जाणारी मदत मिळवून दिली आहे . वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अनेक रुग्णाचे यामुळे प्राण वाचले आहेत . नेमणूक केलेल्या आरोग्यदूताकडून रुग्णांना येणाऱ्या अडीअडचणींसोबतच मानसिक आधार दिला जातो. सोबतच मदतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सहकार्य केले जाते व मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुद्धा केला जातो . वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे प्राण वाचलेल्या अनेक रुग्णांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत.