KINWATTODAYSNEWS

अनाथ बालकांसाठी महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 10 :-  जिल्ह्यात कोविड अथवा इतर कोणत्याही कारणामुळे पालकांचा मृत्यु झाला असेल आणि अशा बालकांना कोणीही नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील, तर अशा बालकांसाठी  सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान 8308992222 व  7400015518 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे, आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून कोविडमुळे दोन्ही पालक मृत्यु पावल्याने अनाथ झालेली बालके दत्तकासाठी उपलब्ध आहेत, असे संदेश फेसबुक व व्हॉटसॲप वर फिरत आहेत. परंतु हे मेसेजेस चुकीचे आहेत. अशा प्रकारे बालके दत्तकास दिली गेली तर ते बेकायदेशीर आहे. महिला व बाल विकास आयुक्तालय आणि Save The Children (India) या दोघांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या मदत कक्षात संपर्क करण्यासाठीचे हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत.  तसेच बालकासाठी यापुर्वी सुरु असलेली हेल्पलाईनही उपलब्ध आहे.
0000

128 Views
बातमी शेअर करा