KINWATTODAYSNEWS

मुलींनी शारीरिक व मानसिक संतुलनासह शैक्षणिक क्षेत्रातही आत्मनिर्भर बनावे-पुनम ताई पवार

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:जिल्यातील धर्माबाद शहरात देशात मुलींचा जन्मदर हा 1020 झाला असून मुलांपेक्षा मुलींची संख्या वाढलीआहे.

यामध्ये केंद्र शासनाची धोरणे, जागृती योजना यातून महिलांचे सबलीकरण झाले,बेटी बचाव बेटी पढाव,सुकन्या,आत्मनिर्भर, आरोग्यसेवा,या केंद्र शासनाने दिलेल्या योजनांमुळे महिलांना समान हक्क मिळाला,त्यांच्यात जनजागृती झाली व घटलेली मुलींची संख्या आता वाढली आहे. दर हजार मुलांमागे मुलींची संख्या ही 20 ने वाढली भारतात जन्मणाऱ्या बालकांमध्ये मुलीची संख्या अधिक असून या पार्श्वभूमीवर मुलींनी आता शारीरिक मानसिक संतुलनासह शैक्षणिक क्षेत्रातही आत्मनिर्भर बनावे असे प्रांजळ प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्यां सौ. पुनमताई पवार यांनी धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूल च्या सांस्कृतिक सभागृहांमध्ये केले.

देशात मुलींचा जन्मदर मुलांपेक्षा वाढल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद देण्यासाठी देशपातळीवर *आनंद महोत्सव* हा कार्यक्रम सप्ताह आयोजित करण्यात आला.त्याचाच एक भाग म्हणून धर्माबादच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या सांस्कृतिक सभागृहात उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटशिक्षण अधिकारी गोडबोले होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या सौ. पुनमताई पवार या होत्या.

आपल्या लहानपणीपासूनच्या जीवनातील चढ-उतार व आई वडिलांचे संस्कार यांचे अतिशय सुंदर उदाहरण देत आज घडीला महिला सक्षमीकरणाची देशाला कशी गरज आहे हे त्यांनी उदाहरण पटवून दिले. यावेळी उपस्थित शेकडो मुलींना वह्या व पेनचेही वाटप करण्यात आले.
उपरोक्त कार्यक्रमास ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरय्या तुंकेवाड, साईनाथ शिरपूरे,सतीश मोटकुल,अमित मुंदडा,चैतन्य घाटे,गिरीधर बुंदेले,नानकसिंग ढिंल्लो,सज्जन गड्डोड,अंजू बालमवार आदी भाजपा कार्यकर्त्यांसह प्रभारी मुख्याध्यापिका सौ खानापूरकर, सहशिक्षिका एम.डी.जोशी, विमल लखमावाड,सौ.सुपारे, शांता बतकुलवार,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बी.एच.रामोड, रत्नाळी केंद्रीय शाळेचे श्री माधवराव वारले,कन्या शाळेचे मुख्याध्यापक मारुती कागेरू, विषय शिक्षक ना.सा.येवतीकर, गंगाधर गंगुलवार,माध्यमिक शिक्षक मारुती जंगलेकर,सुहास मुळे,संजय गैनवार,आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती छपरे यांनी केले तर आभार सौ. सुपारे यांनी व मानले.

115 Views
बातमी शेअर करा