नागपूर : ‘जागतिक मानवाधिकार दिनी’ प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या वतीने१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मा. न्यायाधिस अभिजित देशमुख, मा. संजय पांडे (वरिष्ठ पोलीस अधीक्षक), डॉ. मिलिंद दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. दिपक कदम (फिल्म निर्माते), डॉ. प्रकाश भागवत (सिने अभिनेता), मा. अश्विनी चंद्रिकापुरे (सिने अभिनेत्री), ब्रह्मकुमारी मनिषादिदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना ‘राष्ट्रीय जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,भंडारा जिल्हा कोष्याध्यक्ष सैनपाल वासनीक, यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास देशातुन प्रत्येक राज्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सुचनांचे काटेकोर पणे पालन करुनच कार्यक्रम पार पाडण्यात आले. प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी.टी. आंबेगावे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव जी भांबोरे विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, पत्रकार प्रवीण भोंदे, पत्रकार रामलाल शहारे, पत्रकार प्रशांत शहारे, भंडारा जिल्हा पदाधिकारी तसेच कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे चे राज्य उपमहासचिव मा. सुर्यकांत हुमणे, जिल्हा सचिव धांडेजी, व जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी पुरस्कार प्राप्त कर्त्यांचे अभिनंदन केले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा ‘राष्ट्रीय जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मान
70 Views