धर्माबाद-तालुका प्रतिनिधी (अब्दुल खादिर)
जिल्हा प्रशासनाने सर्व तालुक्याचे शंभर टक्के लसीककरणाबाबतीत आदेश देताच धर्माबादेत आज प्रशासनाने संयुक्तिक तपासणी सुरू केली आहे. तहसिलदार दतात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाच्या प्रमुखांना सोबत घेत व्यापारी, नागरिकांचे झालेल्या लसीककरणाचे प्रमाणपत्र तपासणी सुरू करण्यात आली असून ज्यांनी एकही डोस घेतला नाही आशा व्यक्तींचा शोध घेत शंभर टक्के लसीकरण अभियानाकडे वाटचाल सुरू करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील 4 गावाचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे तर 24 गावात 80 टके पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.9 प्राथमिक आरोग्य केंद्र एक नागरी दवाखाना व एक प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामीण भागात तर शहरात ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे.
शहरात विविध सण -उत्सवात, धार्मीक कार्यात देखील सामाजिक उपक्रम म्हणून लसीकरण शिबिरे ठेवण्यात आली त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत झाली.
संभावित तिसरी लाट येण्यापूर्वीच सर्वांचे लसीकरण पूर्ण करू घेण्यावर प्रशासन भर देत आहे. आज शहरात तहसीलदार दतात्रय शिंदे,मुख्याधिकारी नीलम कांबळे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.इक्बाल शेख,पोलीस निरीक्षक संजय हिबारे, डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार ,नगर परिषदचे कार्यालयीन अधीक्षक बाबुराव केंद्रे , सूर्यकांत मोकले,रूकमाजी भोगावार आदीजन व्यापारी ,नागरिकांचे लसीकरण झाले की नाही याचे प्रमाणपत्र तपासणी केली आहे व ज्यांनी अद्यापही लस घेतली नाही त्यांना लस घेण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
चौकट…
संभावित तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण हा एकमेव सक्षम उपाय आहे त्यामुळे तालुक्यात शंभर टक्के लसीककरणा बाबतीत पंचायत समिती विभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतिना तर नगर परिषद कार्यालयास शहराचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन आलेल्या सूचना देण्यात आली आहे शाळा, निमशासकीय कार्यालय व इतर विभागास देखील लसीककरणाबाबतीत सूचित करण्यात आले असून या अभियानात सर्वांनी लस घ्यावी असे तहसिलदार दतात्रय शिंदे यांनी केले आहे