लोहा,( प्रतिनिधी शिवराज दाढेल लोहेकर
गेली अनेक दिवसांपासून लोहा तालुक्यासह जिल्हाभरात चोरीच्या अनेक घटना घडतच आहेत.लोहा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असले तरी वरचेवर परिस्थिती वेगळी दिसत आहे.शहरातील व ठाण्याच्या हद्दीतील, परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे.कोणत्याही अफवा पसरवू नयेत. लोहा पोलीसांना सहकार्य करावे असे आवाहन लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे. शहरात यापूर्वी दोन गंभीर घटना घडल्या आहेत.चोरीच्याही घटना घडत आहेत.याचा अर्थ रोजच चोरी होत आहे असे नाही. मागील एक दोन घटनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. तरी सर्वांनी सतर्क राहावे. चोरांच्या नावाने अफवा पसरवू नयेत.अफ़वामधून एखादी वाईट घटना घडू शकते. कोणीही संशयित आढळला तरी मारहाण करू नका. खूप जास्त लोक जमून गस्त करण्याची आवश्यकता नाही, रोज वेगवेगळी माणसे गस्त करिता नेमवली जावीत.चोर कधीही दहा दहाने येत नसतात तरीही नागरिकांनी सतर्क राहावे. कोणालाही संशयावरून मारहाण न करता पोलिसांना संपर्क साधण्याचे व पोलीस येईपर्यंत दक्ष राहण्याचे आवाहन
पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी केले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे–पो.नि.संतोष तांबे.
117 Views