KINWATTODAYSNEWS

किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
बोधडी परिसरातील पिंपरफोडी येथे काल दि 12 डिसेंबर 2021 रोजी वारकरी संप्रदायातील वैष्णव पंथीय भक्तगणांचा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष गावच्या सरपंच अनुसया डाके ह्या होत्या तर मेळाव्याचे उदघाटन कोंडबा महाराज तोटेवाड सावरीकर अध्यक्ष किनवट तालुका यांनी भगवान विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन केले. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश महाराज बोधडी कर, बळीराम तर्फे वाड, अंकुश महाराज बोधडी कर, सलाम महाराज दहेगावकर, मारुती महाराज बोधडी कर, तुकाराम लाखाडे बोधडी कर यांच्यासह आढावा समितीचे माजी अध्यक्ष भगवान हुरदुके, मारुती दिवसे पाटील, कॉ अडेलू बोनगीर, गंगाधर तोट्रे ,अंकुश साबळे, माजी सरपंच कोकाटे, दत्ता झिंगरे, चंद्रकांत गारोळे, यांच्यासह मेळाव्यासाठी जलधारा व बोधडी परिसरातील नंदगाव, जलधरा, सावरगाव, कोल्हारी, धानोरा, पिंपरी, सावरी, थारा, डोंगरगाव, सोमागुडा, सुंगागुडा, सिंगारवाडी, इंजेगाव, बोधडी बु , सिंदगी इत्यादी गावांसह इतर अनेक गावातील जवळपास चारशे ते पाचशे वारकरी उपस्थित होते.

याप्रसंगी तोटेवाड महाराज पुढे बोलताना म्हणाले की वारकरी गाव पातळीवर गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे अविरत काम करत आहे अशा वारकऱ्यांना उतारवयात शासनाने जाहीर केल्याप्रमाणे किमान मानधन देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी त्यांनी केली यासाठी वारकऱ्यांनी व्यवस्थित अर्ज करण्याचे आवाहन केले यासाठी अध्यक्ष या नात्याने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कॉम्रेड अडेलू बोनगीर मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले की संत-महात्मे हे खऱ्या अर्थाने समाजात असलेल्या अनिष्ट रुढी रितीरीवाज परंपरा सह मनुष्यात असलेले षडविकार संपवून समाज मानसिकदृष्ट्या सुदृढ व व्यसनमुक्त होण्यासाठी कार्य केलेले आहेत. या महान संत महात्म्याचा वारसा चालवणार्‍या वारकऱ्यांना ही शासनाने मानधनाचा दिलासा देऊन त्यांना प्रबोधनासाठी चालना द्यावी अशी मागणी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकिसन गर्दस्वार यांनी केले तर प्रास्ताविक राजू गारोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राजु गारोळे , अडेलू बोनगीर, भागवत डाके यांनी केले होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

524 Views
बातमी शेअर करा