किनवट :- देशातील लोककला. लोकसंस्कृती. आणि लोकपरंपरा यांचे अधिक संवर्धन व संगोपन व्हावे यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने सबंध देश पातळीवर राबविल्या जात असलेल्या वंदे भारतम नृत्य उत्सव अंतर्गत त्या-त्या राज्यातील लोक कलेचे जतन करणाऱ्या लोक कलावंतांना मुंबई येथे भारत सरकारच्या वतीने निमंत्रित करण्यात आले होते त्यात संस्कार भारती देवगिरी प्रांत शाखा किनवट च्या लोक कलावंताच्या संघाला आदिवासी लोकनृत्य सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले दिनांक 10 डिसेंबर रोजी पार पडलेल्या विभागीय चाचणीत या संघाने लोक नृत्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली लवकरच दिल्ली येथे 2022 मध्ये होणाऱ्या प्रजासत्ताक दिना निमित्त च्या पथसंचलनात या संघास लोककला सादर करण्यासाठी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. केंद्रीय पातळीवरील परीक्षकांनी या लोकांना त्याची योग्य दखल घेऊन पुढील सादरी करणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .या संस्कार भारती शाखेच्या वतीने सदर स्पर्धेसाठी संघ सहभागी व्हावा या अनुषंगाने देवगिरी प्रांत वनवासी कला आयाम प्रमुख प्रोफेसर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने यशस्वी सादरीकरण करून देवगिरी प्रांताचा नावलौकिक उंचावला आहे .या संघाचे नेतृत्व भारत कोडापे यांनी केले संघांमध्ये कीर्तिराज कोडापे. विशाल कोडापे.अनिकेत तोडसाम अविनाश गेडाम लघु दुर्वे ऋतिक गेडाम अमोल सिडाम दत्ता धुर्वे श्रावण तोडसाम प्रमोद मडावी व अंकुश मडावी यांनी सहभाग घेतला संघ यशस्वीतेसाठी देवगिरी प्रांत महामंत्री डॉ जगदीश देशमुख मातृ शक्ती विधा प्रमुख डॉ स्नेहल पाठक .सहकोष प्रमुख अभयजी श्रंगार पुरे नांदेड जिल्हा अध्यक्ष दि मा देशमुख तसेच कल्याण समितीचे अध्यक्ष अविनाश नेवे कोकण प्रांत महामंत्री विजय काळे यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. संस्कार भारती हे संघटन लोककलेच्या संवर्धनासाठी देशपातळीवर कार्य करते .कला साहित्य यामध्ये आपली लोक परंपरा जतन करण्याचे कार्य यातून मोठ्या प्रमाणात केले जाते या किनवट शाखेने नांदेड येथे यापूर्वी लोक कलावंतांच्या लोक नृत्याचे सादरीकरण करून सहभाग नोंदवला आहे .किनवट शाखेचे जिल्हा अध्यक्ष संजय मरडे.. अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी सचिव निलेश भिलवडी कर चित्रकला विधा प्रमुख तांडूरकर सदस्य धोंडीबा साकुळे यांनी विशेष परिश्रम घेऊन संघ यशस्वीतेसाठी प्रमुख योगदान दिले या विजयी संघाचे किनवट रेल्वेस्थानकावर दिनांक 12 डिसेंबर रोजी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी पत्रकार विजय जोशी छायाचित्र संकलक कदम यांनीही कलावंतांना शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे संचालन संजय महाजन मरडे यांनी केले तर मार्गदर्शन प्रोफेसर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले सर्व कलावंतांचे आभार निलेश भिलवडी कर यांनी मानले.
वंदे भारतम नृत्य उत्सव अंतर्गत त्या-त्या राज्यातील लोक कलेचे जतन करणाऱ्या लोक कलावंतांना मुंबई येथे भारत सरकारच्या वतीने निमंत्रित
316 Views