किनवट : येथून जवळच असलेल्या गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मातोश्री कमलताई ठमके सभागृहात रविवार (दि.12 ) रोजी सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सकाळी 11. 30 वाजता ज्येष्ठ नाटककार यादव तामगाडगे गुरुजी लिखित ‘ क्रांतीसूर्य ‘ व ‘ रमा ‘ या नाट्यग्रंथाच्या आयोजित प्रकाशन सोहळ्यास बहुसंख्य रसिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय बौध्दमहासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कौशल्य प्रकाशन, औरंगाबादचे प्रकाशक डॉ. अशोक गायकवाड , नांदेड येथील ज्येष्ठ समीक्षक प्रा . डॉ . प्रकाश मोगले , स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडचे संस्कृती व माध्यम अभ्यासक प्रा. डॉ . राजेंद्र गोणारकर , नाटककार प्रा. सुरेश कटकमवार , ज्येष्ठ कवी रामजी कांबळे व सावित्रीबाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके उपस्थित राहतील.
राजा तामगाडगे प्रास्ताविक व उत्तम कानिंदे सूत्रसंचालन करतील. रमेश मुनेश्वर आभार मानतील. कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिजन , किनवट संचालित वामनदादा कर्डक संगीत अकादमीच्या वतीने प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे , प्रकाश सोनवणे , सुरज पाटील , साहेबराव वाढवे यांच्या संगीत साथीने सुरेश पाटील व आम्रपाली वाठोरे गीते प्रबोधनाची सादर करतील.
या कार्यक्रमास बहुसंख्य रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजक आयु. अनित्य कांबळे , डॉ . विजय कांबळे , महेंद्र नरवाडे , प्रा . डॉ . पंजाब शेरे , रुपेश मुनेश्वर , भारतध्वज सर्पे , भिमज्योत मुनेश्वर , शिलरत्न पाटील व राहूल तामगाडगे आदिंनी केले आहे.
ज्येष्ठ नाटककार यादव तामगाडगे लिखित ‘क्रांतीसूर्य ‘ व ‘ रमा ‘ नाट्यग्रंथाचे आज प्रकाशन
535 Views