KINWATTODAYSNEWS

संयम सेवाभावी संस्था, लातूर तर्फे प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे आणि अनीता दोरवे यांचा सत्कार संपन्न

लातूर दि.१० डिसेंबर २०२१
सेवानिवृत्तीला अवघे दोन वर्ष राहिले असताना नेट परीक्षा व पी.एचडी.पदवी संपादन करून महाराष्ट्रातील समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसमोर प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी निर्माण केला एक वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल त्यांचा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनीता दोरवे यांचा सत्कार संयम सेवाभावी संस्था, लातूर तर्फे नूकताच करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ममता सत्यपाल भडके, सामाजिक कार्यकर्ते देविदास कांबळे (नांदेड), प्रा.डॉ.संजय गवई, नंदू काजापुरे, संयम गवई, सुमित भडके आणि सार्थक गवई यांची उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यांतील हंचनाळ (नदी वाडी) येथील मुळ रहिवासी, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, समाजकार्य विभाग, लातूर येथील माजी विद्यार्थी तथा जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालय, नांदेड येथील ज्येष्ठ प्रा.रावसाहेब दोरवे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची पी.एचडी. पदवी नुकतीच प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या अंमलबजावणीत ग्रामपंचायतीची भूमिका-एक अभ्यास (संदर्भ नांदेड जिल्हा) या विषयावर संशोधन केले असून त्यांना मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई जि.बीड येथील प्राचार्य डॉ.प्रकाश जाधव यांचे संशोधक मार्गदर्शक तर सह-संशोधक मार्गदर्शक म्हणून स्वा.रा.ती.म.वि.नांदेड येथील सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रोफेसर डॉ.घन:श्याम येळणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, समाजकार्य विभाग, लातूर येथे १९८६ रोजी या वर्षात समाजकार्य पदवी तर सन १९८८ या वर्षात एम.एस.डब्ल्यू. हे कर्वे समाजसेवा संस्था, पुणे येथे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आशा केंद्र, पुनतांबा, जि.अहमदनगर येथे फिल्ड कॉर्डिनेटर म्हणून ४ वर्ष तर कासा संस्थेत ३ वर्ष फील्ड ऑफिसर म्हणून उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. तसेच त्यांनी सन १९९३च्या किल्लारी भूंकप मदत व पुनर्वसन कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदविता होता.
त्यांची अध्यापनाची एकूण २४ वर्ष पूर्ण झाली असून सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, येथे समाजकार्य अभ्यास मंडळाचे निमंत्रित सदस्य म्हणून कार्यरत असून त्यांनी १५ वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यक्रमाधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. सन १९९७ ते २०१२ या कालावधीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून त्यांच्या मार्गदर्शनामूळे एका स्वयंसेवक विद्यार्थ्याला राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे एकूण ०६ पुरस्कार मिळाले आहे. त्यानी रासेयोमध्ये जिल्हा समन्वयक म्हणून तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे रासेयो सल्लागार समिती सदस्य महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये व्यक्तिगत जीवनापेक्षा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व दिले त्यामुळेच त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून एकूण १० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांच्या या उज्वल यशामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता दोरवे आणि चिरजीवांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे त्यांना दोन चिरंजीव असून ते दोघेही उच्च विद्याविभूषित आहेत. त्यापैकी स्वप्नील दोरवे हा हैदराबाद येथील Piramal swasthya Management and Research Institute मध्ये समुपदेशक अधिकारी म्हणून कार्यरत असून दुसरा मुलगा वैभव दोरवे याने मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे दोन वर्ष प्रशिक्षण केल्यानंतर सध्या तो दिल्ली येथे कार्यरत आहे.
प्रा.डॉ.रावसाहेब दोरवे यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व स्वयंसेवी संस्था क्षेत्रातील अनुभव हा मोठा असून त्यांनी सेवानिवृत्तीला अवघे दीड ते दोन वर्ष उरले असताना सन २०१२ रोजी नेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज त्यांना पी.एचडी.पदवी प्रदान करण्यात आली त्यामुळे त्यांनी समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे आहे याचा आपण सर्वांना सार्थ अभिमान आहे असे म्हणणे नक्कीच गौरवाचे ठरेल.
त्यांना पी.एचडी. पदवी प्रदान झाल्याबद्दल त्यांचा नुकताच लातूर येथे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील ५२ समाजकार्य महाविद्यालयातील सर्व संस्थाचालक, प्राचार्य, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवी संस्थेतील कार्यकर्ते आणि माजी आजी विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

80 Views
बातमी शेअर करा