*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:9. जिल्यातील लवकरच होणाऱ्या नगर पालिका,परिषद निवडणुका होणार असल्यामुळे आम. राजेश पवार यांच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील धर्माबाद येथे गेल्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाचे बहुतांशी उमेदवार अगदीच थोडक्या मताने पराभूत झाले हीच परिस्थिती नायगाव नगरपंचायतीची सुद्धा गेल्या निवडणुकीत होती त्यावेळेस मी आमदार पण नव्हतो पण आता मी आमदार आहे
गेल्या वेळेसच्या अक्षम्य अशा झालेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करा आणि संघटित होऊन निवडणुका लढवून नगरपालिकेची सत्ता काबीज करा असे घणाघाती प्रतिपादन आमदार राजेश पवार यांनी आपल्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी करून जणूकाही आगामी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पुनम ताई पवार यांच्याही हृदयस्पर्शी मनोगतांमुळे सर्व भाजपा अंतर्गत गटातटात अगदी नवचैतन्याचे वातावरण पसरले असून त्यांच्यात स्फुरण असल्याचे दिसत होते.
रेल्वे गेट क्रमांक दोन व वेंकटेश्वरा गॅस एजन्सीच्या समोर अगदी भव्यदिव्य असे आमदार राजेश पवार यांनी जनसंपर्क कार्यालय थाटले.ते अगदी अद्ययावत केले असून सर्वच पक्षीय जनतेच्या सर्व समस्यांचे निराकारण येथे केले जाणार आहे.सदरील कार्यालयाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते बाबारावजी भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार राजेश पवार, पुनमताई पवार,यांच्यासह नायगाव नगरीची बुलंद तोफ तथा भारतीय जनता पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष कोंडीबा शिंदे पाटील,भाजपाचे एकनिष्ठ पडद्यामागील कार्यकर्ते भीम रेड्डी, रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा सौ.मीना नलवार,ऍड.विनायकराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शंकरगंज येथील जागृत साईबाबा मंदिराचे पुजारी साईप्रसाद देशमुख यांनी कार्यालयाची विधीवत धार्मिक पूजा आमदार राजेश पवार व सौ पुनम ताई पवार यांच्यासमवेत केली.तर बाबाराव भालेराव यांच्या हस्ते रिबीन कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नायगाव तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष कोंडीबा पाटील शिंदे,सौ मीनाताई नलवार याहीया खान पठाण,अंकित गोधा, यांनी आपल्या मनोगतातून आमदार राजेश पवार व पुनमताई पवार यांच्या जनहितार्थ कार्याची पोचपावती देत धर्माबाद नगरपालिकेची सत्ता कशी मिळवावी यासंदर्भात आवाज दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पाटील डांगे यांनी करत एकजुटीने काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे असे संकेत दिले.
*चौकट* इतर पक्ष्यांच्या कार्यशैलीला कंटाळून व आमदार राजेश पवार व त्यांच्या पत्नी पुनमताई पवार यांच्या अखंडित कार्याला भारावून धर्माबादची दोन मोठी प्रसिद्ध अशी युवाशक्ती श्रीनिवास आंदेलवाड व अनिल बेंडके यांनी भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या साक्षीने प्रवेश केला.
सदरील जनसंपर्क कार्यालय हे सर्वांसाठी खुले राहणार असून सर्वांच्या समस्याचे निराकरण येथेच होणार आहे,यामध्ये गट-तट इतर पक्ष जाती धर्म असा भेदभाव कधीही होणार नसून सर्व नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही आमदार राजेश पवार यांनी केले पुढे बोलताना केले.
या कार्यक्रमास आवर्जून असे गोविंद रामोड,सुनील पाटील शिंदे,रमेश आण्णा गौड,डी. आर.अण्णा कंदकुर्तीकर,हिंदू युवा संघटनेचे अध्यक्ष सतीश मोटकूल,भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष चैतन्य घाटे, सोशल मिडीयाचे मराठवाडा प्रमुख साईनाथ शिरपूरे,भाजपाचे शहराध्यक्ष रामेश्वर गंदलवार,प्रतिष्ठित व्यापारी अंकित गोधा,अमित मुंदडा,सज्जन गड्डोड,यांच्यासह गिरीधर बुंदेले,नानकसिंग ढिंल्लो, विठ्ठल उरेकर,तुकाराम पाटील महागवळी,संतोष लखमावाड, आदींची तर ग्रामीण भागातून अशोक पाटील वडजे,विठ्ठल पाटील चोळाखेकर,
गोवर्धन नरवाडे,शिवदास पाटील करखेलीकर,शिवाजी पाटील चोंडी,दत्तात्रय आलूरोड,नागनाथ जिंकले,पांडुरंग जगदंबे,गोविंद रामोड,शिवारेड्डी,साईनाथ मुत्तेमवार,माधव पाटील गाडे, ईश्वर आवरे,रामचंद्र सोमठाणे, शंकर पाटील कदम, पंढरी भोजमोड,गोविंद पाटील पिंपळगाव ,श्रीनिवास पाटील भुतावळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कदम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अवघ्या एका रात्रीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
उपरोक्त कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाल्यामुळे शहरात भाजपाच्या गटात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून विरोधकांच्या गटात मात्र धडकी भरल्याचे चित्र दिसत आहे.