*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात बनावट जीएसटी घोटाळा समोर आला.मुंबई येथून पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आणलेल्या एका सनदी लेखापालासह दोघांना आज दि.8 डिसेंबर रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8 नोव्हेंबर रोजी 1200 लिटर बायोडिझेल भरलेली गाडी क्रमांक एम.एच.38 ई.1438 पकडली. पहिला आरोपी त्या गाडीचा चालक मुतहारखान महेबुब खान हा होता.त्यानंतर औरंगाबाद येथील शेख कादर अली शेख अफजल अली यास पकडण्यात आले.या संदर्भाची चौकशी पुढे-पुढे जात गेली तेंव्हा हैद्रालुबे इम्पॅक्स प्रा.लि.काळबादेवी मुंबई या कंपनीच्यावतीने मुळात ज्याचा लोखंड जोडण्याचा व्यवसाय आहे.त्याला बायोडिझेल पुरविण्यात आले.त्याच्याकडे बायोडिझेल खरेदी करण्याची परवानगी पण नाही.त्यानंतर औरंगाबाद येथील शेख कादरअलीने कोणाकडून हे बायोडिझेल खरेदी केले तेंव्हा हैद्रालुबे इम्पॅक्स प्रा.लि.चे नाव पुढे आले.हैद्रालुबे ही कंपनी 1 सप्टेंबर 2021 रोजी नोंदणी करण्यात आली आहे. आणि या कंपनीच्या नावावर जवळपास 3 कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला आहे.त्यामुळे या कंपनीवर शंका आली.पोलीसांचे काम शंकेपासूनच सुरू होते आणि ते द्वारकादास चिखलीकरांनी पुढे चालवले.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मुंबई येथून या हैद्रालुबे कंपनीचे संचालक तथा सनदी लेखापाल (सी.ए.) शरद भागवत रुस्तगी (43) रा.अंधेरी(मुंबई) आणि सतिशचंद्र दत्तात्रय मोरे (53) रा.दादर (मुंबई) या दोघांना पकडून आणले.यातील सतिशचंद्र दत्तात्रय मोरे हे संगीत निर्देशकपण आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे.
आज 8 ऑगस्ट रोजी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर,पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्र्वर चव्हाण,पोलीस अंमलदार संजय केंद्रे,विठ्ठल शेळके,शेख रब्बानी, बजरंग बोडके,बालाजी तेलंग,बालाजी केंद्रे, दादाराव श्रीरामे,रणधिर राजबंन्सी यांनी पकडलेल्या दोघांना न्यायालयात हजर केले.
न्यायालयात ही हैद्रा लुबे कंपनीचा मुळ कार्यकारी संचालक शोधायचा आहे कारण जीएसटी या शासकीय महसुलाचा गैरवापर करून बायोडिझेलचा व्यवसाय सुरू आहे. ही सर्व माहिती मुंबईशी जोडलेली आहे.त्यामुळे या दोघांना जास्तीत जास्त दिवस पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी पोलीस निरिक्षक द्वारकादस चिखलीकर यांनी केली. न्यायाधीश कुलकर्णी यांनी मुंबईच्या दोन जणांना 11 डिसेंबरपर्यंत अर्थात तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.