KINWATTODAYSNEWS

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्या मागणीसाठी खासदार हेमंत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

हिंगोली : हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करणे गरजेचे असून शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव तातडीने मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज ( ८ डिसें ) रोजी भेट घेऊन केली. यावेळी हिंगोलीचे माजी खासदार शिवाजीराव माने यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष्याच्या बाबतीत अत्यंत मागास असून यामुळे जिल्ह्यातील सिंचनाखालील जमिनीचे क्षेत्र खूप कमी आहे . दरवर्षी जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात ,परंतू त्यावर काहीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेऊन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्राद्वारे विनंती करून हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती . त्यानुसार महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ( दि. ८ डिसें) आज रोजी बैठकीचे आयोजन करून खासदार हेमंत पाटील यांना आमंत्रित केले होते. त्यानुसार मुंबई राजभवन येथे झालेल्या बैठकीला खासदार हेमंत पाटील यांच्यासह हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार शिवाजीराव माने यांची यावेळी उपस्थिती होती . यावेळी झालेल्या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष्याची आणि भौगोलिक क्षेत्राची परिपूर्ण माहिती दिली ते म्हणाले कि, हिंगोली जिल्ह्यात हनुमंतराव शिफारसी नुसार कळमनुरी आणि औंढा हे दोन तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रात गोदावरी खोऱ्याअंतर्गत कयाधू ,पूर्णा ,पैनगंगा व मध्य गोदावरी हे उपखोरे विभागलेले आहेत एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४०४५९३ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीखाली आहे .तर प्रकल्पीय सिंचन क्षमता ८४२५८ हेक्टर असून निर्मित सिंचन क्षमता ५८१०८ हेक्टर एवढी आहे . या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करण्याचे एकूण १४० प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. याकरिता २३० कोटी निधी आवश्यक आहे . परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही . त्यामुळे खासदार हेमंत पाटील यांनी राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीत सिंचन अन्यशेष्याच्या अनुषंगाने अनेक विषयावर चर्चा केली. राज्यपाल महोदयांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

121 Views
बातमी शेअर करा