किनवट ( प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील जमिनीचे आरोग्य सूस्थितीत ठेवणे गरजेचे असल्याचे मत सेवा संस्थेचे किनवट येथील प्रकल्प समन्वयक शिवा पाटील सोळुंके यांनी व्यक्त केले.
गणेशपुर येथे दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवा पाटील सोळंके म्हणाले की, माती आरोग्यदायक अनन निर्मितीचा पाया माती अत्यंत महत्त्वाचा परंतु नेहमीच दुर्लक्षित राहिलेला घटक आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी पाच डिसेंबर जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना एक वेगळी तयार केली जाते. आणि वर्षभर त्या आधारे मुद्दा संवर्धनासाठी जागृतता केली जाते या वर्षीच्या म्रदा दिवसाची थीम “थांबवा मातीचे शहरीकरण वाढवा मातीची उत्पादकता” ही आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जमिनीचे गुणधर्म , माती कशी तयार होते. मातीचा प्रातिनिधिक नमुना घेणे ,माती परीक्षण करणे का गरजेचे आहे सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपाययोजना गरजेनुसार पाण्याचा वापर संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्याचे उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी विचारलेल्या विविध शंकेचे निरसन केले. आधुनिक सेंद्रीय व तांत्रिक शेती करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी येथील महिला शेतकरी वंदना जोगदंड, संगीता सोळुंके, नर्मदा मौजे, कलावती चव्हाण ,कल्पना गाडे, किशोर कराळे ,शिवाजी चव्हाण, श्याम बरमे, जयवंत आगलावे, सेवा संस्थेचे कर्मचारी सचिन कदमसर ,किशोर गायकवाड ,श्याम बरमे ,गणेशपूर येथील सेवा संस्थेच्या महिला प्रतिनिधी पूजा कराळे त्यांच्या सहकारी लक्ष्मी सोनटक्के, शीतल घुकसे ,पूजा बोकारे ,वनिता कागणे ,स्वाती कदम, नंदा राठोड यांची उपस्थिती होती.
किनवट तालुक्यातील जमिनीचे आरोग्य सूस्थितीत ठेवणे गरजेचे -शिवा पाटील सोळंके
537 Views