मुखेड : दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र व पंचायत समिती मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन पंचायत समिती सभागृह मुखेड येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष दि.वृ.मि,मं.म.संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे हे होते, कार्यक्रमाचे उदघाटन मा गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिती मुखेड,तर प्रमुख पाहुणे ,पंचायत,समिती,
सभापती,दिव्यांग सं. जि संपर्क प्रमुख नागोराव बंडे पाटिल, ता अध्यक्ष आर एम कांबळे, वि.स. मुखेड अध्यक्ष रंजीत पाटिल,पंचायत समिती विस्तार अधिकारी, सर्व ग्रामविकास यांच्या उपस्थितीत अकरा दिव्यांगाचा सत्कार,व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पंचायत समिती सभापती यांनी दिव्यांगाना शुभेच्छा देऊन आम्ही आपल्या कोणत्याही अडचणी बदल आपल्या सोबत असल्याचे सांगितले.
मा गटविकास अधिकारी यांनी दिव्यांग बांधवांनी आपल्या व्यंगामुळे खचित न होता सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून दिव्यांग कायदा 2016 प्रमाणे जे काहि सवलती हक्क देण्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नाही, किव्वा कोणीही दिव्यांग पाच टक्के निधी वाटप केला नाही,असे न म्हणता सर्व ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ निधी वाटप करावा निधी देण्याअगोदर वस्तुची पावती न घेता त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करावी असे आदेशित केले.
विस्तार अधिकारी, दिव्यांग पदाधिकारी यांनी दिव्यांगाच्या अगी असलेल्या गुणांचे कौतुक करुन शासन प्रशासन सर्व सामान्य जनतेनी त्याच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा असे अनेक वक्ते यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, सर्व पदाधिकारी यांनी दिव्यांगाच्या सतरा मांगन्या संदर्भात निवेदन देऊन न्याय हक्क द्यावा
आज जागतिक दिव्यांग दिन दिव्यांगाच्या अंगी असलेल्य कला गुणाच चे कौतुक, व त्यांच्या हक्काच्या सवलती कायदा. माहिती व्हावी त्याचा उत्साह, सामर्थ, शक्ती ऊर्जा निर्माण व्हावी त्यांच्या बदल बघण्याची दृष्टिकोन बदलला म्हणून जागतिक दिव्यांंग दिन साजरा करण्याचा आला
दिव्यांग बाधवाना लोकप्रतिनिधी,शासन, प्रशासन, पञकार, जनतेची दिव्यांगाकडे बघण्याचा विशेष लक्ष देऊन न्याय हक्क द्यावा
*दिव्यांगाचे दूख कसे कळेल ? जसा पाण्यातला मासा झोप घेतो कसा ! जावे त्यांच्या वंशा तेव्हाची कळे*
म्हणून लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनास दिव्यांगाचे दु:ख कळत नसल्याने आपली हाल अपेक्षा होत असल्यामुळे आपण खचित न होता *दिव्यांग होने का गम नहि! हम किसी से कम नही?* हे दाखविण्यासाठी सर्वानी संघटिपणे संघर्षात सहभागी व्हावे असे आव्हान अध्यक्षीय समारोपात डाकोरे पाटील ने केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ता अध्यक्ष आर एम कांबळे, मगदूम शेख, दताञय सोनकाबळे,नामदेव झरे,सलिम दौलताबाद, बाबु कांबळे, मानसिंग वडजे,गवाले मौला, सोमवारे अशोक,दुर्गाजी दाबनवाड, गौतम गवते, सुरेखा शिंदे, सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी ईत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक ता अध्यक्ष आर एम कांबळे यांनी केली