घुघूस/प्रतिनिधी:
लॉईडस मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने स्थानिक महिलांना 10 ते 15 टक्के आरक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारच्या मागणी चे निवेदन मुख्यव्यवस्थापकाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर महिला अध्यक्षा सौ. सुशिला सत्यनारायण डकरे यांनी केली आहे.
अनेक वर्षापासून शहरात कार्यरत असलेली लॉईडस मेटल कंपनी मध्ये स्थानिक महिलांना 10 ते 15 टक्के आरक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणे करुन महिलांचे आर्थिक बाजू भक्कम होईल. सध्या कोरोना मुळे कुटुंब चालवणे कठीण झाले आहे.
महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, मुंबई यासारख्या ठिकाणी अनेक कंपन्यांमध्ये महिला कार्य करीत आहेत. त्या धर्तीवर घुगुस मध्ये ही महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. अशा प्रकारचे निवेदन सौ. सुशीला डकरे यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे.सदरील निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मागासवर्गीय सेल तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे,सुशीला डकरे महिलां शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुरेश बोबडे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती, श्रीनिवास गोसकुला, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुद्ध राज कांबळे सचिव, देशभक्ति डकरे सचिव, मोहम्मद इस्लाम अब्बासी यांच्या स्वाक्षरी आहेत.
सदरील निवेदनाच्या प्रतीलिपी राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, तसेच माननीय बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्याकडे देण्यात आल्या आहेत.