KINWATTODAYSNEWS

बोधडी खुर्द येथे क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा व जननायक तंट्या भिल्ल ह्या महामानव यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बोधडी (बाबुराव वावळे)
आज दिनांक ४/१२/२०२१ रोजी किनवट तालुक्यातील बोधडी खुर्द येथे क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा व जननायक तंट्या भिल्ल ह्या महामानव यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधडी खुर्द येथील सरपंच सौ, सुमनबाई लक्ष्मण काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी बोधडी खुर्द येथील उपसरपंच डॉ.नामदेवराव कराड हे होते. माजी उपसरपंच श्री प्रल्हादराव मुंडे व ग्रामपंचायत सदस्य श्री, संदिप मुंडे, मारोती गायकवाड,प्रेमसिंग कटारे व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण पार पडला.
नांदेड जिल्हा,ओ.बि.सी.आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री.बाबुराव केंद्रे यांनी क्रांती सुर्य बिरसा मुंडा व जननायक तंट्या भिल्ल यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.आणि समाजातील तरुण तरुणींना शिक्षणातून अग्रेसर राहून महत्त्वाच्या जागा कशा पद्धतीने काबीज करता येतील याकडे तरूणांनी लक्ष्य द्यावे. आणि भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा उपयोग करून घेतला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन या वेळी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व समाज बांधवांनी व जयंती मंडळाच्या वतीने मोलाचं योगदान दिले.
जयंती मंडळाचे अध्यक्ष,श्री.शाम बेरडवाड
उपअध्यक्ष, साहेबराव आढाव.सचिव, नागनाथ खुडे. उपसचिव, अरविंद किरवले.कोषाध्क्ष, बाबुराव काळे, मार्गदर्शक माधव सिडाम.व सदस्य.नामदेव ठाकरे,सुदाम काळे,भरत धनवे,माधव मोहकर, गोपाळ तलांडे कैलास ठाकरे नागनाथ सिडाम, विठ्ठल सिडाम, बालाजी काळे यांनी हा जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

413 Views
बातमी शेअर करा