किनवट/प्रतिनिधी: नांदेड ट्रॅफिक पोलीस चा गजब प्रकार समोर आलेला आहे. तो असा की, ‘गाडी किनवट मध्ये चालन फाडले नांदेड मध्ये’ किनवट येथील बंडू किसन राठोड यांची स्कुटी गाडी न.MH26AV9203 आहे.परंतु सदरील गाडी खरेदी केल्यापासून नांदेड येथे गेलीच नाही परंतु या स्कुटी चे नांदेड ट्रॅफिक पोलीस ने चलन क्र. NANCM20004891050 दि.26 जून 2020 रोजी 12:31वाजता रामेश्वर मंगनाळे या ट्रॅफिक ऑफिसर ने फाडले आहे.या वेळेस व या तारखेस सदरील गाडी ही किनवट येथे होती.तर चलन नांदेड येथे कसे काय फाडले?
यावरून नांदेड पोलीस किती कर्तव्यात एकनिष्ट आहेत याची प्रचिती येते. सदरील चॅलनवर दोन फोटो अपलोड केलेले आहेत. ते फोटो बंडू किसन राठोड यांच्या गाडीचे नाहीत त्यांचा वेगळा क्रमांक आहे. परंतु बंडू किसन राठोड राहणार परसराम नाईक तांडा ता.किनवट त्यांच्या स्कुटी नंबर वर हे चलन कसे काय फडण्यात आले याची चर्चा सुरू असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी बंडू किसन राठोड यांनी केली आहे. यामुळे त्यांना नाहक मानसिक व त्रास सोसावा लागला आहे हे विशेष.