KINWATTODAYSNEWS

बांधकाम विभागातील अभियंता श्री कावळे यांचा नव्याने पदभार झाल्याने सत्कार

किनवट शहर प्रतिनिधी( राज माहुरकर)

किनवट येथिल जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या उपअभियंत्याचा कार्यभार आता एस.एस.कावळे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आज (१ डिसेंबर) पदाचीसूत्रे हाती घेतल्यानंतर पं.स.सदस्यांचे प्रतिनिधी म्हणून गजाननराव मुंडे यांच्यासह पं.स.तील कर्मचार्‍यांनी त्यांचे स्वागत केले.
किनवट स्थित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता पाठक यांच्या बदलीनंतर १ डिसेंबर रोजी एस.एस.कावळे रुजू झाले आहेत. कावळे हे यापुर्वी नांदेडला होते. त्यांच्या कामकाजाची कार्यशैली चांगली असल्यामुळे विकासाच्या कामाला दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कावळेंनी पदभार स्विकारल्यानंतर पंचायत समिती सदस्या सत्यभामाबाई मुंडेंचे प्रतिनिधी तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी तालुकाध्यक्ष गजाननराव मुंडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर.डी.क्षिरसागर व ग्रामसेवक संघटनेचे ताडेवार, गुट्टे, शिरसेवाड, पांचाळ यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

498 Views
बातमी शेअर करा