देगलूर तालुका प्रतिनिधी (बसवंत जाधव आलूरकर )
कुठलीही पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज तोड करून जबरदस्तीने वीज बिलाची वसूली करणाऱ्या MSEB विरूद्ध शेतकऱ्यांच्या मनात तीव्र असंतोष आहे. देगलूर तालुक्यातील अशा शेकडो शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख कैलास येसगे कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज देगलूर येथील MSEB कार्यालय गाठून विभागीय कार्यकारी अभियंता चेटलावार व उपअभियंता गारगोटे यांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. लाईट कट करताना पूर्व सूचना का दिली नाही..? आम्ही वापरले नसलेल्या वीजेचे बील शेतकऱ्यांनी का भरायचे…? आपण भरा म्हणत असलेली रक्कम ही शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे परखड मत यावेळी कैलास येसगे सह सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता तालुक्यातील हजारो शेतकरी संघटीत होऊन उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे निश्चय करण्यात आला.
जास्तीत जास्त शेतकरी उद्या होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कैलास येसगे, बालाजी कनकंटे, सुर्यकांत देशमुख, व्यंकट गोपछडे, विजय देशमुख, प्रविण इनामदार, दिपक रेड्डी, अरविंद देशमुख, शहाजी बाबरे, बसवंत पटणे, चेतन नाईक, नरसिंग पाटील, पंढरी इंगोले, गुलाब पाटील, हरीफ साब, संतोष चिद्रावार, निळकंठ देशमुख, सतिष बामणे, निळकंठ पाटील, दिलीप पाटील, बालाजी बरसमवार, संजय पाटील, गंगाधर देशमुख, गंगाधर आऊलवार, मारोती पाशमवार व इतर शेतकऱ्यांनी केले आहे.