रिसोड(प्रेसनोट):पोलीस स्टेशन रिसोड हद्दीतील ग्राम लोणी खुर्द हे गाव मराठवाड्याच्या व बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर आहे लोणी खुर्द गावात सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात. काही दिवसांपूर्वी लोणी खुर्द गावांमध्ये महापुरुषाच्या पोस्टवरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला होता.
सदर वादाचे प्रत्यंतर होऊन दिनांक 20 नोव्हेंबर 20 21 रोजी गावातील एका गटाने गैर कायद्यांची मंडळी जमून दुसऱ्या गटातील काही लोकांना कुराड, लोखंडी गज व काठी अशा शस्त्रांनी जीवाने मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली होती. सदर घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे ठाणेदार पोलीस निरीक्षक सारंग नवलकार, पोलीस निरीक्षक महेंद्र गवई, सुबनावळ, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, सुरगडे, व पोलीस अंमलदार सह तात्काळ पोहोचले. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्यातील जखमी इसमांना पोलीस गाडीतून उपचाराकरिता तात्काळ ग्रामीण रुग्णालय रिसोड येथे रवाना केले.
तसेच घटनास्थळी पूर्णतः शांतता निर्माण करून कायदा व सुव्यवस्था चा कोणत्याही प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. गुन्ह्यातील जखमी रामभाऊ पारवे यांच्यावर रिसोड रुग्णालयात प्राथमिक उपचार झाल्यावर लागलीच त्याचे बयाना वरून 19 आरोपी व इतर यांच्याविरुद्ध 21 11 2021 रोजी पोलीस स्टेशन रिसोड येथे अप क्रमांक 797/2021 कलम 307,354,323,324,341,452,143,144,147,148,159,504,506 भादवी सह कलम 8 पोक्सो, सह कलम 3(1)(r),3(1)(s),3(2)(va),3(1)(w) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर गुन्ह्यांमध्ये आणखी एक आरोपी चा सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या 20 करण्यात आली आहे. गुन्ह्यातील 4 आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपी हे फरार असल्याने गुन्ह्याचे तपाशी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री यशवंत केडगे यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे 4 वेगवेगळी आरोपी शोध पथके तयार केली. सदरच्या शोध पथकाने अहोरात्र परिश्रम घेऊन गुन्ह्यातील उर्वरित 16 पाहिजे आरोपी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्ह्याचा तपास वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे हे करीत आहेत.
तरी सदर गुन्हा मधील 20 आरोपी असून सर्व 20 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ते सध्या पोलीस कस्टडीत आहेत. लोणी खुर्द गावात 1 अधिकारी व 2 पोलीस अंमलदार यांचे फिक्स गार्ड लावण्यात आलेले असून त्याठिकाणी 1 एस आर पी section तैनात करण्यात आले आहे. गुन्ह्यातील पीडित जखमी यांना पोलिस संरक्षण देण्यात आलेले आहे. गावामध्ये सुद्धा शांततेचे वातावरण असून पोलिसांनी सदर प्रकरणी दोषी वर अतिशय कडक कायदेशीर कारवाई करून लोणी खुर्द व आजूबाजूचे परिसररात कोणतेही तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊ दिलेले नाही.
सदरच्या घटना घडल्यानंतर दोन्ही समाजाच्या प्रतिनिधीची जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना शांत राखण्या संबंधी आवाहन केले व त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनी केलेल्या कारवाईवर सदरच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले व आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
तरी कोणीही समाजकंटक व्यक्तींनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासंबंधीचा बेकायदेशीर कृत्य करू नये असे आढळल्यास दोषीवर खडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वाशिम जिल्ह्यातील वाशिम जिल्हा पोलीस दलाच्यावतीने आवाहन करण्यात येते की, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे कृत्य कोणी समाजकंटक करीत असल्यास त्याबद्दलची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन पोलीस प्रशासनास मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.