नांदेड/प्रतिनिधी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ११ वे जिल्हा अधिवेशन दि.१ डिसेंबर रोजी नांदेड शहरातील बि.के.फंक्शन हॉल, माळटेकडी रेल्वे स्टेशन अंडर ब्रिज जवळ नूरी चौक बायपास येथे भरत असून सकाळी १०.३० वाजता शहीद स्मारकास अभिवादन व ध्वजारोहण करून अधिवेशनाची सुरवात करण्यात येणार आहे.सकाळी ११.०० वाजता माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य प्रा.डॉ.कॉ.उदय नारकर (कोल्हापूर)हे खुल्या सत्राचे उदघाटन करतील तर माजी आमदार मा.गंगाधरराव पटणे हे हे स्वागताध्यक्ष आहेत.प्रमुख उपस्थिती कॉ.पि.एस.घाडगे सर (बीड) कॉ.किसन गुजर (नाशिक) यांची असून कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.विजय गाभणे हे असणार आहेत.उपरोक्त त्रेवार्षिक अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात येतील.दलित व महिलांवरील वाढते अत्याचार,महागाई,आरोग्य,शिक्षण तसेच बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नावर चर्चा होऊन ठराव मांडण्यात येणार आहेत. पुढील सत्राचे कामकाज जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम यांच्या प्रस्तावने नंतर सुरू करण्यात येईल अशी माहिती शहर सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी निवेदनाद्वारे दिली आहे.
आयोजन कमिटी मध्ये सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.अरुण दगडू,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.करवंदा गायकवाड,कॉ.मगदूम पाशा,कॉ.बंटी वाघमारे आदी शहर कमिटीचे सभासद आहेत.
१ डिसेंबर रोजी माकपाचे ११वे जिल्हा अधिवेशन नांदेड मध्ये;खुल्या सत्रामध्ये सर्व सामान्यांना बसण्याची मुभा – कॉ.गंगाधर गायकवाड
180 Views