*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.26.जिल्यातील धर्माबाद येथे येथील गंगासिटी मधील सुदर्शन मंगल कार्यालयात आमदार राजेश पवार द्वारा आयोजित *धर्माबाद भविष्यवेध* या चर्चासत्रीय कार्यक्रमात धर्माबादच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या असून विविध पक्षीय मान्यवरांचा आमदार राजेश पवार यांच्या भूमिकेस निसंकोचपणे पाठिंबा देण्याचा एकमुखी सूर निघाला.
आमदारांच्या कार्यकक्षेला मतदारांनी रस्ते नाली किंवा एखादे समाज मंदिर अशा कार्यातच बांधून ठेवले होते.
जनतेला माहीत नव्हते की हे जे कार्यकक्षे स्थानिक स्वराज्य संस्थेचे असतात.त्या व्यतिरिक्त आमदारांची कार्यकक्षा फार मोठे असते.स्थानिक स्वराज्य संस्थेला पूर्ववत असले तरी फार मोठी विकासकामेही त्यांच्याकडून अपेक्षित असतात.आणि विकास कामे साधतांना कुठल्याही एकपक्षीय व एक धर्मीय माणसांना हे काम शक्य नसून यामध्ये सर्वपक्षीय व सर्वधर्मीय नागरिकांचा समावेश असावा या माध्यमातून लोकांना या गोष्टीचे ज्ञान व्हावे यासाठी आमदार राजेश पवार यांनी *धर्माबाद भविष्यवेध* या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करून धर्माबाद तालुक्याच्या विकासावर काल आज आणि उद्या या पार्श्वभूमीवर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी विविध पक्षीय विविध धर्मीय अतिशय बुद्धिमान व्यक्तींना त्यांनी आमंत्रित करून त्यांच्या शहर व तालुका विषयाच्या विकासाबाबत काय अपेक्षा आहेत या जाणून घेतल्या.
यामध्ये धर्माबादचे प्रतिष्ठित नागरिक गोवर्धन मालू यांनी धर्माबाद शहराच्या विकास व समस्या व त्याचे निराकारण, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.कमल किशोर काकांनी नगरपालिका व तालुक्याची राजकीय जडणघडण व शहरावरील विकास दृष्टी, रत्नाकर पाटील कदम यांनी शेतकरी व कृषी सेवा,रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा मीनाताई नलवार यांनी शहरातील सद्यस्थिती व उपाय योजना, माजी उप नगराध्यक्ष सखाराम निलावार यांनी रेल्वे विषयक प्रभावी प्रश्न व मागण्या,माजी उपनगराध्यक्ष रमेशचन्द्र तिवारी यांनी रेल्वे व शहरातील समस्या, शिरसखोड चे सरपंच गफारखान यांनीही ग्रामीण समस्या, व बाबुराव पाटील आलूरकर यांनी पत्रकारांच्या व शहरांच्या समस्या व शेतकऱ्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला.तर बाजार समितीचे अभ्यासू संचालक गोविंद पाटील रोशनगावकर यांनी धर्माबाद तालुका निर्मितीचे 22 वर्षे व 22 प्रश्न याबाबत मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी युवकांचे भविष्य या विषयावर मार्गदर्शन करताना जगायचे असेल तर शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे पण सद्यस्थितीत व्यसन व गुन्हेगारीकडे युवकांची वाटचाल असल्याचे प्रतिपादन करीत समाज सुधारणा झाली तरी गुन्हे करायचे प्रमाण वाढतच आहे.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर एक दुस-यांच्या चुका काढत बसू नका,आणि जीवनात सहजरीत्या जगत असताना जेवढे आपल्या हातून प्रथम दर्शनी गुन्हे रोखण्याचे काम करा हे काम करणाराच खरा सिटीजन असून कोरोना लसीकरणांतही हलगर्जीपणा करु नका असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजक आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पुनमताई पवार यांनी उपरोक्त सर्वांच्या मनोगतांना उत्तर देतांना पुनम ताई पवार म्हणाल्या की विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज येऊन ठेपली असून कुठलाही पक्षभेद जातिभेद न करता धर्माबाद शहर व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी धर्माबाद विकास परिषद किंवा समिती या नावाखाली एकत्रित यावे असे आवाहन करीत दिव्यांगांच्या समस्या व दारूबंदी यासाठी महिलांनाही आवाज उठवू द्या त्यांचा आवाज दाबू नका अशा प्रतिक्रिया दिल्या. तर आमदार राजेश पवार यांनी रोजगारावर भर देताना नवीन एम आय डी सी च्या संदर्भात युद्धपातळीवर पाठपुरावा करण्यात येईल व आपल्या समस्या जाणून घेतल्या त्या दिशेने उपाययोजना करणे माझे कर्तव्य ठरते असा थोडक्यात बोलत बोलणे कमी पण कृती जास्त हे दाखवून दिले.
*चौकट-१* 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून पाळला जातो उपरोक्त धर्माबाद भविष्यवेध हा कार्यक्रम याच दिवशी आल्यामुळे संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सल्लागार जे के जोंधळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय सुंदर चित्र आमदार राजेश पवार यांना भेट दिल्यामुळे उपस्थित सर्वधर्मीय हजारो आमंत्रित प्रेक्षक भारावले.
*चौकट क्रमांक- 2* आमदार राजेश पवार यांची नायगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक न निवडणुकीची धुरा सांभाळण्यासाठी प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे पक्षाध्यक्ष चंद्रकांत दादा पवार यांचे पत्र याच वेळी सोशल मीडियावर फिरत असल्यामुळे सर्वांनाही धर्माबाद नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार हेच नेतृत्व करतील असा आशावाद निर्माण झाल्यामुळे समाधानाचे वातावरण पसरले होते.
*चौकट-३* उपरोक्त कार्यक्रमास निमंत्रण पत्रिकेवर आमंत्रित जिल्हाधिकारी विपीन विटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर,तर नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची गैरहजेरी सर्वांनाच खटकली होती.पण त्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना दूरध्वनीवरून चर्चा केली असता नांदेड जिल्ह्यात नायगाव मतदारसंघातील नायगाव नगरपंचायतीची निवडणूक असल्यामुळे शहरात आचारसंहिता लागली आणि जिल्हाधिकारी निवडणूक नियंत्रण अधिकारी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही पण आमदार राजेश पवार महोदयांच्या सूचनेनुसार उमरी व धर्माबाद तालुक्यातील विकासात्मक कामासाठी मी कटिबद्ध आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर ह्या वर्टिगो या अचानक उद्भवणाऱ्या आजारान येऊ शकल्या नाहीत.तर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे हे अतिशय महत्त्वाच्या शासकीय कामासाठी मुंबईला गेल्याचे कळाले.
धर्माबाद भविष्यवेध म्हणजेच धर्माबादच्या विकासावर दृष्टिक्षेप या चर्चासत्रीय कार्यक्रम कमालीचा यशस्वी झाल्यामुळे धर्माबाद शहरात एक प्रकारचे चैतन्य पसरले असून उपरोक्त कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार राजेश पवार यांचे विश्वस्त विजय डांगे,रमेश गौड,तुकाराम पाटील महागवळी,डी.आर.कंदकुर्तीकर,सतीश मोटकुल,गोविंद रामोड व भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन शिवराज पाटील गाडीवान यांनी केले.