KINWATTODAYSNEWS

,मुखेड येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न 110 रक्तदात्यानी केले रक्तदानविशेष पोलिस महानिरिक्षक व जिल्हाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.27.मुखेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ,स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती यांच्या वतीने दि . २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान गौरव दिन व २६/११ मध्ये मुंबई येथे झालेल्या आतंकवाद्याच्या भ्याड हल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पन करण्याकरिता व थैलेसिमीया आजाराने ग्रस्त मुलांसाठी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.महापुरुषाच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले,त्या नंतर २६/११ च्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना पुष्पांजली व आदरांजली वाहुन जिल्हा परिषद शाळेचे मुलीनी सविधान प्रस्ताविकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद असून ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.या रक्तदान शिबिरास नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डॉ . विपीन इटनकर,आमदार डॉ तुषार राठोड,तहसीलदार काशिनाथ पाटील,पोलीस निरिक्षक विलास गोबाडे , गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव माकणे,डॉ.दिलीप पुंडे,डॉ. अशोक कौरवार,मौलाना अब्दुल गफार,अब्दुल बशीर माजीद, विजय लोहबंदे, एस. के. बबलू ,खुशाल पाटील उमरदरीकर,डॉ.रामराव श्रीरामे,संतोष बोनलेवाड,सतीश भुरेवार,नगरसेवक अनिल जाजू , नगरसेवक श्याम यमेकर,राहुल लोहबंदे,नगरसेवक गोविंद घोगरे,डॉ.रणजित काळे , शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे,ज्ञानेश्वर पाटील डुमणे,दीपक लोहबंदे,सुनील मुक्कावार,हेमंत घाटे,शंकर वडेवार,शिवशंकर पाटील कलंबर,शेखर पोपुलवार,हबीब खान,अनिल शिरसे, श्रावण नरबागे,शिवानंद बंडे,शिवसेना शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, जयप्रकाश कानगुले,बजरंग कल्यानी,देगलुर इन्साफचे अध्यक्ष असलम शेख,नाजिम शेख,कंधारचे शादुल शेख व मुखेड तालुक्यातील इन्साफ,SFI,अब्दुल कलाम समितिच्या सर्व पदाघिकारी यांची उपस्थिती होती.हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठीऑल इंडिया तन्जिल ए इन्साफ, मुखेड,स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया,मुखेड (SFI),डाॅ.ए.पि.जे.आब्दुल कलाम समाज सेवा समिती, मुखेड व यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचलन जयभीम सोनकांबळे तर आभार आसद बल्खी यांनी मानले.

468 Views
बातमी शेअर करा