KINWATTODAYSNEWS

शिष्यवृती परिक्षेत तालुक्यातून १०१ विद्यार्थी पात्र

किनवट : तालुक्यातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ५ वी ) चे ९० व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ . ८ वी ) चे ११ विद्यार्थी असे एकूण एकशे एक जण पात्र ठरले असून तीन शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी ) चा अंतरिम ( तात्पुरता ) निकाल बुधवार (दि.२४ ) रोजी दुपारी २.३० वाजता संकेतस्थळावर घोषीत झाला आहे. तालुक्यातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी ) नोंदविलेल्या १०९४ विद्यार्थ्यांपैकी ९० विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८ वी ) ६९० विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी पात्र झाले आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी ) चा तालुक्यातील तीन शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड व केंद्र प्रमुख बी.बी. डुमने यांनी वारंवार भेटी देऊन मार्गदर्शन केल्याने तसेच अनिल कांबळे व सचिन सरोदे या शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतल्याने अतिदुर्गम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरपहाडचा आणि नविन रेड्डी, राजा तामगाडगे व जीवराज जाधव या शिक्षकांच्या रेखीव नियोजनाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलकजामचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी अशोक हामदे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक रमनराव व मुख्याध्यापक राहूल चव्हाण यांनी सतत सराव घेतल्याने अशोक पब्लीक स्कूल पळशी या शाळेचा निकालही १०० टक्के लागला आहे. अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यानी दिली. सर्व यशवंतांचे सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख राम बुसमवार व उत्तम कानिंदे आदिंनी अभिनंदन केले आहे.

547 Views
बातमी शेअर करा