KINWATTODAYSNEWS

तळा कॉलेज मध्ये संविधान दिन व २६/११ स्मृतिदिन संपन्न

तळा :प्रतिनिधी

तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कला-वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, तळा येथे संविधान दिन व २६ /११ स्मृतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, पोलीस उपनिरीक्षक सुरज गेंगजे, पोलीस कर्मचारी विष्णूदास तिडके, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पाटील एन. सी., प्रा. पोपट कसबे, प्रा. मचे एन. टी. प्रा. वाले आर. बी., द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. भगवान लोखंडे, डॉ. नानासाहेब यादव सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी प्रा. नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तर धनश्री सर्जे व सानिया अवसरे या विद्यार्थिनींने स्फूर्तिदायक देशभक्तीपर गीत गायन केले. यावेळी तळा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी २६/ ११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या धाडसी कार्याची माहिती दिली व ग्रंथालयाला भेट दिली असता ग्रंथपाल मनोज वाढवळ यांनी विविध प्रकारचे ग्रंथ, पुस्तकं, मासिकं व वृत्तपत्राची माहिती दिली. संविधानाचे महत्त्व सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सुरज खराडे यांनी पोलिसांचे कार्य व संविधानातील मूलभूत हक्क याबाबत माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. नितीन पाटील यांनी शहिद झालेले पोलीस अधिकारी विजय साळसकर, हेमंत करकरे, अशोक कामठे यांनी जनतेच्या रक्षणासाठी लढता लढता प्राणांची आहुती कशी दिली याची यथोचित माहिती दिली तर तुकाराम ओंबळे यांच्या धाडशी कार्याला सलाम करण्यात आला.

पी. पी. कसबे यांनी भारतीय संविधानाची रचना, संविधानातील तत्वे, नागरिकांचे मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. भगवान लोखंडे यांनी संविधानातील सौंदर्यस्थळे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी हल्ल्यातील शाहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या हौतात्म्याच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन आंबेगावे डी. टी. यांनी तर आभार मचे एन. टी. यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

105 Views
बातमी शेअर करा