KINWATTODAYSNEWS

परिवर्तनवादी लढाई लढण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे- बालाजी सिरसाट

किनवट प्रतिनिधी

किनवट: संभाजी ब्रिगेड किनवट तालुका कार्यकारणीची बैठक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवश्री.बालाजी पाटील सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली व किनवट तालुका अध्यक्ष शिवश्री सचिन पाटील कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत गोकुंदा,किनवट येथील शासकीय विश्रामगृह येथे तालुका कार्यकारणीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी मार्गदर्शन करताना सिरसाट म्हणाले की संभाजी ब्रिगेडने येणाऱ्या काळात परिवर्तनवादी लढाई लढण्याच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे तसेच मुंबई येथे ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिन व राज्यस्तरीय महामेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.

यावेळी किनवट माहूर विधानसभा अध्यक्ष शिवा पाटील पवार जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद आरसोड तालुका सचिव समाधान उटकर तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश इंगोले शहर उपाध्यक्ष नरेश संकेनेनिवार मांडवी सर्कल प्रमुख ऋषिकेश जामगे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

359 Views
बातमी शेअर करा