KINWATTODAYSNEWS

लोणी येथे लहूजी साळवे फलक लावल्या मुळे मातंग समाजावर जातीवादी गाव गुडांनी प्राण घातक हल्ला या घटनेचा लहू सेनेने तिव्र शब्दांत निषेध केला

नागपूर ः वासिम जिल्ह्यातील रिसोड तालूक्यातील लोणी येथे लहूजी साळवे यांची प्रतिमा वा फलक लावल्या मुळे मातंग समाजावर प्राण घातक हल्ला केला.जातीवादी गुंडांनी गावातील लाईन बंद करुन मातंग समाजातील लोकांच्या घरा मध्ये घुसून त्यांच्या वर कुराड व धारदार शस्ञांनी क्रूर पणे हमला केला.
काही जखमीना अकोला,वासिम , तर काहीना नागपूर येथे सुखदेव भानुदास पारवे , ज्ञानेश्वर पारवे याला नागपूर शासकिय मेडीकल काॕलेज , नागपूर येथे भरती करण्यात आले. काहींची प्रकृती चिंता जनक आहे.
या प्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल केले असून ३ आरोपी फरार आहेत .
लहू सेना प्रमुख संजय कठाळे यांनी मेडीकल मध्ये जावून जखमी सुखदेव पारवे , ज्ञानेश्वर पारवे यांना भेटून घटनेची संपूर्ण विचारपुस केली , त्यांना न्याय मिळून देण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणात आरोपीवर गुन्हे दाखल करुन जातीवादी गाव गुंडांच्या टोळी वर मोक्का लावण्यात यावा.आणि मातंग समाजाला पोलिस संरक्षण देण्यात यावे, त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी.अशी मागणी लहू सेने प्रमुख संजय कठाळे , श्री.मुरलीधर रणखांम , गणेश साळवे यांनी केली आहे.
ही घटना अत्यंत दुदैवी व निंदणीय आहे,या घटनेचा लहू सेने संजय कठाळे , मुरलीधर रणखांम , गणेश साळवे यांनी तिव्र शब्दांत निषेध केला.
या घटनेच्या विरोधात लहू सेने तर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असे लहू सेने प्रमुख संजय कठाळे, मुरलीधर रणखांम , गणेश साळवे यांनी एका संयुक्त पञकात म्हटले आहे.

874 Views
बातमी शेअर करा