औरंगाबाद येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था संचलित कृषी महा विद्यालया अंतर्गत सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा ग्रामीण जाणीव कार्यानुभव कार्यक्रम स्वतःच्या गावीच चालू आहे यामध्ये महाविद्यालयातील सातव्या सत्रातील विद्यार्थी हे सध्या covid-19 च्या प्रादुर्भावामुळे आपापल्या गावी राहून कार्यक्रम पार पडत आहेत.
यामध्ये महाविद्यालयाचा विद्यार्थी माधव विश्वनाथ भिसे हा मौजे शिंगार वाडी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी कशी करावी ह्याचे प्रात्यक्षित करून दाखवले, व जैविक खताची, बीज प्रक्रिया आणि जनावरांना चारा कशा पद्धतीने द्यावा आणि त्याची काळजी कशी घ्यायची व शेतकऱ्याने स्मार्टफोन द्वारे हवामान, रोग, व पिकाची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात प्रात्यक्षित करून दाखवले
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव पद्माकर राव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत देशमुख व महाविद्यालयाचे संचालक तथा प्राचार्य डॉक्टर दत्तात्रेय शेळके यांचे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना लाभत आहे
तर प्रात्यक्षिकासाठी डॉक्टर प्रविण बैनाडे, प्रा. अतुल भोंडवे, डॉ. श्रीकांत फाजगे, डॉ. मोहिनी देशमुख, डॉ. प्रदीप कुमार उलेमाले, डॉ. सचिन गायकवाड, प्रा. विकास भराडे. प्रा. प्राची बर्डे, प्रा. अश्विनी क. प्रा. नंदू भागस. आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रणिता मुळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
जैविक खताची, बीज प्रक्रिया आणि जनावरांना चारा कशा पद्धतीने द्यावा आणि त्याची काळजी कशी घ्यायची व शेतकऱ्याने स्मार्टफोन द्वारे हवामान, रोग, व पिकाची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात माधव विश्वनाथ भिसे यांनी दिली माहिती
125 Views