KINWATTODAYSNEWS

साहीत्य कला संस्कृती व सामाजीक कार्याची आवड, राजकारणात रस नाही:- रत्ना दहिवेलकर,

श्री क्षेत्र माहूर
सामाजीक कार्यासाठी राजाश्रय असावा असे म्हणतात मात्र राजकारणा शिवाय सुद्धा सामाजीक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करता येत. साहीत्य कला व संस्कृती जोपासतांना शेवट पर्यंत ,निस्वार्थ समाजसेवा करनार असल्याचे पुणे आकाशवाणी केंद्रात व दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर निवेदिका उद्धोषिका रत्ना दहिवेलकर यानी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधताना सांगीतले.
त्या माहूर येथे रेणुकादेवी दर्शना साठी आज दिनांक 21 रोजी आल्या होत्या. या वेळी त्यांनी पर्यटन व संस्कृतीक माहीती देताना देवीचे साडेतीन पीठापैकी मुख्य पीक असलेल्या तिर्थक्षेत्र माहूर च्या अपूर्ण विकास कामा संबंधीत नाराजी व्यक्त केली. दळणवळन व उत्तम रस्ते हे धार्मिक संस्थान च्या विकासासाठी व त्यावर अवलंबुन असणाऱ्या व्यवसायासाठी अत्यंत आवश्यक असतात. या साठी सरकार परीसरातील रस्ते बांधणीवर विशेष निधी ची तरतुद करून तिर्थक्षेत्र माहुरचा विकास साधावा असी अपेक्षा व्यक्त केली.

सोनी टी. वर लोकप्रिय झालेले स्वराज्य जननी जिजामाता या मालिके मध्ये तसेच मराठी चित्रपट संस्थानीक मध्ये रत्ना दहिवेलकर यांनी भूमिका वाठविली आहे.तर हिन्दी फिल्म थ्रीलर फिल्म रांचाल मध्ये त्यांनी डॉक्टर या अभीनय साकारला असुन या फिल्मचे काही शुटींग अपूर्ण असुन ती लवकर प्रदर्शीत होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांच्या मराठी व हिन्दी शार्ट फिल्म असून अनेक स्टेज शो सांगीतीक हिन्दी मराठी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन व सूत्र संचलन करण्याच्या योग बड्या सिलीब्रिटीज व राजकीय नेत्यां च्या मंचावर आल्याचे त्यांनी पत्रकारांशी गप्पा मारतांना सांगीतले. माहूर दर्शनाचा योग हा आयुष्यातील अनेक सुखद प्रसंगा पैकी एक असुन देवभुमी माहुर ला परत परत येण्याची उत्कंठा मनात असेल असे ही त्या म्हणाल्या.या वेळी त्यांच्या समवेत नितीन दहीवेलकर मांडवी येथील साईश्रध्दा ज्वेलर्स चे संचालक चंदन मांडणं व पत्रकार विश्वास कांबळे, कादर भाई दोसानी इलीयास बवाणी, यांची उपस्थीती होती.

410 Views
बातमी शेअर करा