किनवट/प्रतिनिधी: आंबाडी येथील प्राचीन हेमाडपंती बालाजी देवस्थान च्या मुख्य गाभाऱ्याची भिंत व शिखराची ही भिंत मागच्या बाजूने सततच्या अतिवृष्टीने पडझड झालेली असून सध्या धोकादायक स्थितीत आहे .
तरी परिसरातील दानशूर व्यक्तीने मंदिराच्या दुरुस्तीसाठी समोर येऊन हातभार लावावा असे आव्हान मंदिर कमिटीचे सुभाष उमाजी चव्हाण भ्रमणध्वनी क्रमांक (9657527375) , कैलास विठ्ठल सिलमवार (9021506819) ,संतोष किशनराव जुनगरे व ग्रामस्थांनी केले आहे .
किनवट शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरील अंबाडी गावात तिरूमला तिरुपती बालाजी चे प्राचीन हेमाडपंथी देवस्थान आहे हा देवस्थान मागे वीस-पंचवीस वर्षाखालील किनवट शहरातील व परिसरातील लोकांनी जीर्णोद्धार केला होता .या दोन-तीन वर्षापासून च्या सततच्या अतिवृष्टीमुळे प्राचीन हेमाडपंथी मंदिराच्या मुख्य गाभार्याच्या मागच्या भिंतीला तडे जाऊन ढासळली आहे तरी याच्या दुरुस्तीसाठी परिसरातील दानशूर नेपुढे येऊन सढळ हाताने मदत करावी अशी मंदिर कमिटी व ग्रामस्था च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे .
आंबाडी येथील प्राचीन हेमाडपंती बालाजी देवस्थान दुरुस्तीसाठी समोर येऊन हातभार लावावा-मंदिर कमिटी
325 Views