अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वाक्यचा निषेध करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुघुस च्या वतीने करण्यात आली.
कंगना या अभिनेत्री ने एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यावर केलेल्या टीकेचा आम्ही निषेध करीत आहोत. तसेच देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे.तेव्हा कुठे 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. परंतु या कंगना बाईने देश 1947 रोजी स्वातंत्र झाला नसून , तो अभी के मध्ये देण्यात आला आहे असे वक्तव्य करत खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले असे वक्तव्य केले आहे . त्यामुळे या बाईला दिलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा. व त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा अशा प्रकारची मागणी घुघुस शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलीस ठाणे घुघुस यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर सत्यनारायण डकरे अध्यक्ष राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल तालुका चंद्रपूर, सुरेश पाटील बोबडे माजी उपाध्यक्ष कृषी बाजार समिती चंद्रपूर, सतीश जयस्वाल ज्येष्ठ कार्यकर्ता, बुद्ध राज कांबळे सचिव राष्ट्रवादी मागासवर्गीय तालुका चंद्रपूर, संजय भालेराव उपाध्यक्ष राष्ट्रवादी मागासवर्गीय तालुका चंद्रपूर, शारदाबाई झाडेआदिच्या स्वाक्षर्या आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत यांनी देशाच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वाक्यचा निषेध करत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुघुस च्या वतीने करण्यात आली
459 Views