किनवट,ता.२१ (प्रतिनिधी)
अस्मानी संकटाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी दिले असून कृषी बिलाचे साजरे करण्यापेक्षा शेतकरी हिताचे प्रश्न सोडवा असे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले आहे.
परतीच्या पाऊसामुळे शेतकर्यांचे हाती आलेले सोयाबीन वाया गेले आहे.ऐन हंगामात पिकांचे पडलेले भाव यामुळे शेतकर्यावंर आधीच आस्मानी तर खाजगी व्यापारयांमुळे सुलतानी संकट असा दुहेरी मारा होत आहे.या उपर विज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांना विजबील वसुलीची सक्ती करत आहेत.विज बील न भरल्यास विज जोडणी तोडली जात आहे.त्यात अधिकची भर म्हणून दिवसा लोडशेडींग तर पाचवीला पुंजलेली आहे. परंतु ज्या प्रमाणे विजबील सक्तीने वसुल केल्या जाते त्या प्रमाणे सुविधा शेतकर्यांना मिळत नाहीत. दिवसा विज कृषी पंपाना मिळत नाही.अशा परिस्थितीत शेतकरी काबाड कष्ट करुन पिकाला पोटच्या पोरासारखे वाढवत आहेत.तेव्हा सक्तीची विजबिल वसुली थांबवून दिवसाची लोडशेडींग बंद करा अशा प्रकारचे निवेदन आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या अत्यंत निगडी चा बनलेला अखंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न बाबत अंधार के राम यांना विचारले असता ते म्हणाले की सध्या महा विकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष केंद्र सरकारने रद्द केलेल्या कृषी कायद्या च्या घटनेचे इव्हेंट साजरे करण्यात मग्न आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याबद्दल तेही रद्द झाल्यानंतर अतिशय उत्साहित असलेल्या महा विकास आघाडी सरकारने राज्यात शेतकऱ्यांची अवस्था मेटाकुटीला आणून ठेवली आहे त्याबद्दल कोणीही चकार शब्द बोला साठी तत्पर नाही. दिवसा वीज पुरवठा खंडित करून रात्रीला व्यवस्थेतीत मिळेल व आपल्या शेतातील पिके भिजवता येईल या मोठ्या अपेक्षेने रात्रीचे जोखीम पत्करून शेतकरी पाणी देण्यासाठी बांधावर रात्र काढत असताना माहूर आणि किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शेतकऱ्यांना सर्पदंश झाले आहेत यात कित्येक निष्पाप शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संपूर्ण घटनाक्रम निवेदनाद्वारे सादर करून दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्याची मागणी आमदार केराम यांनी केल्याची माहिती दिली.