KINWATTODAYSNEWS

तीन कृषी कायदे परत झाल्याची घोषना झाल्यांने शेतकऱ्यांनी केला जल्लोष

किनवट/प्रतिनिधी:
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२० मध्ये सुरवातीला अध्यादेश काढून मंजूर करून घेतलेले शेतकरीविरोधी, जनताविरोधी आणि कार्पोरेटधार्जिणे तीन कृषी कायदे भारत सरकार रद्द करत असल्याची घोषणा केली आहे.

संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान सभा व सर्व समविचारी संघटना या निर्णयाचे स्वागत करत असून या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या संसदीय प्रक्रिया लवकरच पार पडण्याची प्रतीक्षा करत आहेत.
तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषनां झाल्यानंतर आज किसान सभा, लाल बावट्याचा कार्यकर्तेनीं किनवट, इस्लापुर येथे फटके वाजवून जल्लोष केला. एका वर्ष चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा ऐतिहासिक विजय झाल असून .या लढ्यात अनेक शेतकरी हुतात्मे झाले. लखीमपूर खीरी हत्याकांडासहित या टाळता येण्यासारख्या मृत्यूंना केंद्र सरकारचा दुराग्रहच जबाबदार आहे अशी टीका करण्यात आली.

तीन कृषी कायदे रद्द करण्याबरोबरच, सर्व शेतीमालाला आणि सर्व शेतकऱ्यांना लाभदायक किंमतीची हमी देणारा केंद्रीय कायदा करावा ही सुद्धा शेतकरीआंदोलनाची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांची ही महत्त्वाची मागणी अजूनही शिल्लक आहे. तसेच वीज दुरुस्ती विधेयकदेखील अजून मागे घेण्यात आलेले नाही. म्हणून समोरील लढा संयुक्त किसान मोर्चा च्या मार्गदर्शना नुसार सुरु राहिल असे किसान सभेने या वेळी म्हटले आहे.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या विवादित कृषी कायद्यांमध्ये जुजबी बदल करून महाराष्ट्रासाठीही तीन नवे कृषी कायदे प्रस्तावित केले होते. केंद्र सरकारने केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली असल्यामुळे राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्रात प्रस्तावित केलेले तीन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी किसान सभा करत आहे.
तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल किनवट, इस्लापुर येथे शेतकऱ्यांनी जल्लोष साजरा केला, या वेळी किसान सभेचे काॅ.प्रभाकर बोड्डेवार, काॅ.खंडेराव कानडे

124 Views
बातमी शेअर करा