बोधडी प्रतिनिधी दिनांक 19 नोव्हेंबर 21
विवादित तीन केंद्रीय कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच अखिल भारतीय किसान सभा शाखा बोधडीने फटाके फोडून निर्णयाचे स्वागत केले.
जून 2020 मध्ये मोदी सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधी तीन केंद्रीय कृषी कायदे पारित केले होते तेव्हापासून अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा आणि देशातील तमाम शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीच्या चहूबाजूने शेतकऱ्यांनी वेढा घालून शेतकरी विरोधी कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते.
या आंदोलनात सरकारच्या विविध हल्ल्यात आणि आंदोलना दरम्यान जवळपास साडेसहाशे शेतकरी शहीद झाले होते. सरकारने आणि गोदी मीडियाने या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बदनाम केल्यानंतरही आंदोलन दिल्ली पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशभर पसरत चालले होते. भारत बंद, रेल्वे रोको, रास्तारोको, निषेध सभा, विविध मोर्चे याद्वारे या शेतकरी विरोधी कायद्याला प्रखर विरोध केला जाऊ लागला होता. देशात वाढत जाणारे आंदोलन आणि शेतकर्यात पसरत जात असलेला असंतोष लक्षात घेऊन मोदी सरकारने आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सदरील तीनही कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा केली. या निर्णयाचे अखिल भारतीय किसान सभा शाखा बोधडी ने फटाके फोडून स्वागत केले आणि सरकारने सर्व शेतीमालाला हमी भव देणारा कायदा पारित करावा अशी मागणी केली याप्रसंगी कॉ अडेलू बोनगीर ,श्याम वाकोडे, मनोज तिवाडी, दिनकर डोंगरे, पप्पू आरमाळकर, गिरी पवार व शेतकरी उपस्थित होते
विवादित तीन केंद्रीय कृषी कायदे परत घेत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करताच अखिल भारतीय किसान सभा शाखा बोधडीने फटाके फोडून निर्णयाचे केले स्वागत
991 Views