किनवट ता प्र दि 18 किनवट तालुक्यातील बोधडी गणातील पंचायत समिती सदस्या श्रीमती सत्यभामा गोविंदराव मुंडे यांच्या 15 व्या वित्त आयोग निधीतून रुपये 11 लक्ष 50 हजार चे विविध विकास कामाचे भूमिपूजन करतांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन गोविंदराव मुंडे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थित बाजार समितीचे उपसभापती श्रीराम कांदे, युवा नेते ज्ञानेश्वर दहिफळे, कोळी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत बॉईनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तर बोधडी जिल्हा परिषद गट हे विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे यावेळी बोलतांना गजानन मुंडे पाटील यांनी उपस्थिताना ग्वाही दिली तर मुंडे यांना बोधडी गटात आजच्या स्थित प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने बोधडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांच्या विरोधी भाजपाला कडवे आवाहन राहणार व माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या सक्रीयतेने किनवट माहूर चे राजकारण ढवळून निघाल्याने सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यात नव उत्साह संचारला आहे.
बोधडी गणातील पंचायत समिती सदस्या श्रीमती सत्यभामा गोविंदराव मुंडे यांच्या 15 व्या वित्त आयोग निधीतून रुपये 11 लक्ष 50 हजार चे विविध विकास कामाचे भूमिपूजन
353 Views