नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
*नांदेड*:जिल्ह्यातील मुदत संपलेल्या नायगाव, माहूर, हिमायत नगर,अर्धापुर नगर पंचायत च्या निवडणुका घेण्यासाठी नायगाव वगळता तिन नगर पंचायतीचे दुसर्यांदा आरक्षण काढण्यात आले.सतरा नगर शेवक सदस्य संख्या असलेल्या या नगर पंचायती मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी चार जागा आरक्षित काढण्यात आल्या असताना नायगाव नगर पंचायत मध्ये मात्र इतर मागास वर्गीयासाठी तिनच जागा चे आरक्षण कोणत्या धोरणाच्या आधारे काढण्यात आले याचे कोडे नगरवासीयांना सुटत नाही.
17 नगरसेवक संख्या असलेल्या नायगाव नगर पंचायतीत इतर मागास वर्गीयासाठी तिन जागा आरक्षित आहेत तर माहूर हिमायतनगर व अर्धापुर या 3 नगर पंचायती मध्ये ही सदस्य संख्या सतरा असताना त्या ठिकाणी इतर मागास वर्गीया साठी चार जागा आरक्षण कशा काय सुटल्या याचे कोडे नागरिकांना सुटत नाही. या बाबद निवडणुक विभागाकडून या मागचे नेमके कारण काय याचा तपसील वार खुलासा होणे नागरिकांना अपेक्षीत आहे. तसे न झाल्यास सदर प्रकरण न्यायालयात जान्याचे संकेत असून या बाबद निवडणुक विभागाणे लोकातील संभ्रम दुर करावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
मुदत संपलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव, हिमायत नगर, माहूर व अर्धापुर नगर पंचायत च्या मुदत संपल्याने या ठिकाणच्या निवडणुक हालचाली सुरू झाल्या होत्या व प्रभागाचे आरक्षण ही जाहीर झाले होते. दरम्यान च्या काळात कोरोना चा कहर वाढल्याने निवडणुका लाबंत गेल्याने शासनाने मुदत संपलेल्या नगर पंचायतीचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली होती.
आता कोरोना चा प्रभाव कमी झाल्याने या चारही नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीचा पहिल्या टप्पा म्हणजे प्रभाग आरक्षण दि.१२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले.या आरक्षण प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर नायगाव नगर पंचायत मध्ये पुर्वी पाच जागा इतर मागास वर्गीया साठी राखीव होते. नविन नियमा नुसार नायगाव केवळ तिन जागा सोडण्यात आल्या तर सर्वसाधारण साठी सात जागा एवजी संख्या दोन ने वाढून ९ झाली.
नायगाव नगर पंचायत बरोबरच माहूर, अर्धापुर व हिमायत नगर नगर पालिकेचे नायगाव बरोबरच म्हणजे दि.१२ नोव्हेंबर रोजी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करून ते परत दि.१५ नोव्हेंबर रोजी काढण्यात आले.
या तिनही नगर पंचायतीची सदस्य संख्याही १७ असताना या नगर पंचायत मध्ये इतर मागासवर्गीय साठी चार जागा सोडण्यात आल्या तर नायगाव चे फेर आरक्षण काढण्यात आले नसल्याने इतर मागासवर्गीय वर्गासाठी तिनच जागा आरक्षित आहेत. इतर ठिकाणी चार व नायगाव तिन का ? या मागील नेमके काय कारण याचा तपसील नागरिकांना कळणे गरजेचे आहे.
*आरक्षण तपसील खालील प्रमाणे*
नायगाव – सर्वसाधारण ९ इतर नागरिकाचा मागास प्रवर्ग ३ अनु सुचीत जमाती १ अनु सुचीत जाती ४
अर्धापुर – सर्वसाधारण ११ इतर नागरिकाचा मागास प्रवर्ग ४ अनु सुचीत जाती २
हिमायत नगर – सर्वसाधारण ११ नागरिचा मागास प्रवर्ग ४ अनु सुचित जाती २
माहूर – सर्वसाधारण १० नागरिकांचा मागास प्रवर्ग ४,अनु सुचित जाती ३