KINWATTODAYSNEWS

वाई बाजारच्या महा रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद.मुस्लिम बंधूंचाही मोठा सहभाग.

श्रीक्ष्रेत्र माहुर /(पद्मा गि-हे)

कोरोनामुळे निर्माण झालेल्या महामारीने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे.मोठमोठ्या दवाखान्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.त्यामुळे शासकीय रक्तपेढीमध्ये निर्माण झालेली रक्ताची मोठी कमतरता सर्वस्तरातील रुग्णाच्या जिवावर बेतणार असल्याचे वास्तव जाणून वाई बाजारला शिवसेनेची युवासेना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.6 मे रोजी आयोजीत केलेल्या महारक्तदान शिबिरात 111 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यात मुस्लिम समाजाच्या रक्तदात्यांनी अधिक सहभाग घेतला.
लागलीच काही दिवसानंतर १८ वर्षावरील सर्वांनाच कोवीड प्रतिबंधक लस दिली जाणार असल्याने पुढील ६० दिवस त्यांना रक्तदान करता येत नाही.त्यामु़ळे अधिक प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडणार असल्याच्या धर्तीवर शिवसेनेची युवासेना व प्रहार जनशक्ती या पक्षाने आयोजीत केलेल्या शिबिराला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करून रक्तदान शिबिराला प्रारंभ करण्यात आला.यावेळी तालुका प्रमुख सुदर्शन नाईक,माहूरचे शहर प्रमुख निरधारी जाधव,युवासेनेचे तालुका प्रमुख विकास कपाटे,प्रहारचे तालुकाध्यक्ष अमजद खान,माजी तालुका प्रमुख दिपक कन्नलवार,अंबादास राजूरकर,अनिल रुणवाल,उदय नाईक,नितीन पाटील कन्नलवार,अभिषेक जयस्वाल,युवा उद्योजक अतिष गेंट्लवार,बाळू चव्हाण,अमन पठान,गजानन कुमरे,आनंद सोनूले,सुभाष खडसे,प्रशांत शिंदे,कार्तिक बेहेरे,विनोद कांबळे,जावेद शेख यांचेसह द पॉवर ऑफ मीडियाची संपूर्ण चमू उपस्थित होती.
डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेडचे डॉ.नितीश इंगोले,डॉ.शरद अवचार,डॉ.बालाप्रसाद भालेराव,डॉ.बाबुराव गायकवाड,अतुल ताकसांडे,परमेश्वर राठोड,शामराव जोंधळे यांनी रक्तसंकलन करण्याचे काम पार पाडले.
सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नि.भालचंद्र तिडके यांनी रक्तदात्यांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले.
आजच्या रक्तदान शिबिरात मुस्लिम बंधूनी रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ही आनंददायीं बाब असल्याचे मत यश खराटे यांनी व्यक्त केले.
कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून अतिशय बिकट क्षणी रक्तदात्यांनी पुढाकार घेवून रक्तदान केल्याने त्यांचे व शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच अमजद खान यांनी आभार मानले.

170 Views
बातमी शेअर करा