किनवट टुडे न्युज । दि 15 जनकल्याण नागरी पतसंस्था किनवटमधील वित्तीय क्षेत्रातील एक नामवंत संस्था असून सर्व प्रकारच्या गरजू कर्ज वाटप व विश्वासार्हता जपत ठेवी स्वीकारून स्वावलंबी स्वरूपाची ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असते खरोखरच रस्त्यावरील छोट्या विक्रेत्यांना उन पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी छत्र्या देवून खर्याअर्थाने पुण्याचे काम केलेआहे असे गौरवोद्गार किनवट चे नगराध्यक्ष श्री आनंद मच्छेवार यांनी आज जनकल्याण पतसंस्था कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात केले अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष श्री गजानन कोत्तावार होते संस्था सचिव श्री अनिरूद्र केंद्रे यांंच्या पुढाकारातून हा कार्यक्रम ठेवला होता माजी सचिव तथा विद्यमान संचालक श्री सुहास कुलकर्णी यांनी प्रास्तविकातून संस्थेची सविस्तर भूमिका मांंडली व सेवाकार्याचा आढावा घेतला पंचायत समिती सभापती श्री दत्ता आडे , माजी उपसभापती गजानन कोल्हे व पंचायत समिती सदस्य व आ. केराम यांचे स्वीय सचिव निळकंठ कातले हे प्रमुख अतिथी होते सात गरजू फळ भाजीपाला विक्रेते तसेच चर्मकार बंधुना छत्री वितरण झाले कार्यक्रमाचा समारोप व आभार मानताना संस्था सचिव श्री अनिरूद्र केंद्रे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले …याप्रंसगी संचालक श्री व्यंकट भातनासे ,सुनिल पाठक तसेच प्रतिष्ठित व्यापारी ऋषभ गटलेवार उपस्थित होते संस्था कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला
जनकल्याण पतसंस्था सामाजिक कार्यात देखिल भरीव कार्य करते हे किनवट नगरीसाठी अभिमानास्पद — नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांचे गौरवोद्गार
73 Views