KINWATTODAYSNEWS

इंजेगाव ते बोधडी मार्गावरील शिंगारवाडी गावालगतच्या पुलाजवळ बालाजी बामणे यांनी स्वखर्चातुन जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम टाकून पुलाची केली दुरुस्ती

किनवट प्रतिनिधी: इंजेगाव ते बोधडी मार्गावरील शिंगारवाडी गावालगत असलेला फुल अत्यंत जीर्ण झालेला असून सततच्या पावसामुळे पुलाच्या सर्वच बाजूची पडझड झाली या पुलावर वाहने चालविताना नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याची बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते बालाजी बामणे यांनी बांधकाम विभागाच्या कार्यवाहीची वाट न पाहता आज प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली व तात्काळ स्वखर्चातुन जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या सहाय्याने मुरूम टाकून पुलाची दुरुस्ती केल्याने या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून वाहनधारक त्यांचे आभार व्यक्त करतआहेत तालुक्यातील इंजेगाव ते बोधडी बुद्रुक रस्त्याला जोडणारा सिंगारवाडी गावालगतचा पूल अत्यंत जीर्ण झाला त्यात सततच्या पावसामुळे पुलाची सर्वच बाजूने पडझड झाली या पुलावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता पुलाच्या दयनीय अवस्थेमुळे या भागातील नागरिकांचा कित्येकदा बोधडी बाजारपेठ व तालुक्यासी संपर्क तुटत होता रहतदारीसाठीअत्यंत धोकादायक बनलेल्या या पुलामुळे नागरिक त्रस्त झाले होते दरम्यान नागरिकांना प्रवासादरम्यान होणारा त्रास टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते बालाजी बामणे मलकवाडीकर यांनी आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी काही कार्यकर्त्यासह सिंगारवाडी गावातील नागरिकांना सोबत घेऊन पुलाची पाहणी केली व तात्काळ स्वखर्चातून जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टरद्वारे पुलावर मुरूम टाकून दुरुस्ती करण्याचे काम केले वाहन चालकासाठी आता हा पूल सोयीचा बनला आहे बामणे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यवाहीची वाट न पाहता सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर केल्यामुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.
बोधडी व किनवटला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असून मागील कित्येक दिवसापासून या मार्गावरील पुलाची अवस्था अत्यंत बिकट व धोकादायक बनली होती इंजेगाव, सिंगारवाडी, गुडा, पिंपरफोडी इंजेगाव आदी ठिकाणच्या नागरिकांना या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत होता प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी पुलाकडे लक्ष देत नसल्याने मी नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चातून फुल दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले माजी आ प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली आम्ही बोधडी व परिसरातील गावांना भेटी देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहोत या मार्गावर नवीन पुलाच्या निर्मितीसाठी नाईक साहेबांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती युवानेते बालाजी बामणे मलकवाडीकर यांनी दिली त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, व सिंगारवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

394 Views
बातमी शेअर करा